Sunday, May 29, 2022

प्रशांत गझल - मी ही तयार आहे !!



आनंदकंद वृत्त - गागाल गालगागा गागाल गालगागा

मी ही तयार आहे !!


धंदे बरेच केले, बसलो कधीच नाही

व्यापार खूप केला, चुकलो कधीच नाही


अनुभव चिकार आले, तावून मी निघालो

धक्केच घेत शिकलो, थकलो कधीच नाही


मदतीस येत होतो, कोणास ही कधीही

नाही कधी न म्हटले, दमलो कधीच नाही


शेतात काम केले, धरणीस मानले, नी

मातीत रंगलो मी, हरलो कधीच नाही


देशास पाहिजे ते, सैनिक तरूण उमदे

मी ही तयार होतो, हटलो कधीच नाही


प्रशांत कदम 

०५~१०~२०२१.

९५९४५७२५५५.

Saturday, May 28, 2022

प्रशांत गझल - हुंडा !!




 गालगागा गालगागा गालगागा - वृत्त - मंजुघोषा


हुंडा !!


गोड माझे शब्द होते का न कळले 

सांग पाहू पाय पाठी का न वळले 


पेटले जर रान सारे वाढलेले 

झाड काटेरी तरी मग का न जळले 


निरपराधी जंगलावर पण निखारे

दुःख सारे बघ वनाचे का न टळले


भ्रूणहत्या का मुलींची लोक करती

चित्त त्यांचे मारताना का न ढळले


होत आहे  छळ वधूचा घेत हुंडा 

जावयाला बांधवांनी का न छळले 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - अक्रित



 8/8/6 - शुभगंगा 

अक्रित 

आज चांदणे ढगात लपले तुझ्या मुळे

शोधत प्रीती उनात हसले तुझ्या मुळे


तुला पाहता गोळा झाले नभात तारे 

अंबर सारे उत्तम सजले तुझ्या मुळे


मत्सरात त्या नाहक रुसल्या अप्सरा जणू 

नयन तयांचे नकळत भरले तुझ्या मुळे 


प्रफुल्लित कसे जग पण झाले पाहता तुला

कित्येकांचे जीवन रमले तुझ्या मुळे


सौंदर्यवती जरी साजणी साधी माझी

जीवनात ह्या अक्रित घडले तुझ्या मुळे


प्रशांत कदम, 

मुंबई, 

१४~०५~२०२२.

प्रशांत गझल - गीत गावे !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 

गीत गावे !!


संगीत ही पुजावे, शब्दांसमेत जावे

आस्वाद अन सुरांचे, माधुर्य घेत जावे


सुमधूर त्या सुरांना, आलाप जर मिळाला

तल्लीन होत सर्वां, आनंद देत जावे


नाही हुषार कोणी, शिकतील गात सारे

पुन्हा प्रयत्न करुनी, शिकवीत तेच जावे


मिळवून यश बरोबर, प्राविण्य संपदावे

संगीत तेच भारी, ऊंचीस नेत जावे


पद्यात बोलतांना, गाण्यात गात जावे

संगीत मैफिलीला, सूरांसवेत जावे


प्रशांत कदम, 

१२~१२~२०२१.

९५९४५७२५५५. 


Thursday, May 12, 2022

प्रशांत गझल - आनंदी जगलो मी !!



 वृत्त - जीवनलहरी -  मात्रा -  ६/६


आनंदी जगलो मी !!


आनंदी, जगलो मी

त्याच मुळे, तगलो मी


दु:ख दिले, नच कोणा

ना कोणा,  हसलो मी


विवादही , केले मी

ना कोठे, फसलो मी


कामाला, ना हसता

कामाशी, गढलो मी


खडतर ते, दैव सदा 

निवांत ना, बसलो मी


प्रशांत कदम,

मुंबई.

०७~०५~२०२२

Tuesday, May 10, 2022

प्रशांत गझल - थांबू नकोस आता !!

 


वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


थांबू नकोस आता !!


पाहू नकोस मागे, मोडू नकोस आता

निश्चित करून ध्येये, सोडू नकोस आता


आता पुढेच जा तू , विसरून मोह माया

दगडा वरील रेषा, खोडू नकोस आता


दुष्टांस सोड पाठी, हाणून पाड त्यांना

हेवे तसेच दावे, जोडू नकोस आता


नाती नवीन सच्ची, जोडून काम घे तू

संगत गुरूजनांची, तोडू नकोस आता 


घे साथ सज्जनांची, काचे समान हो तू

वचनास जाग थोडे, फोडू नकोस आता 


प्रशांत कदम, 

९५९४५७२५५५,

१३~०१~२०२१.

प्रशांत गझल - भारत !!



 वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


भारत !!

झेंडे खरेच येथे गगनात भारताचे

सुफलाम नाव मोठे जगतात भारताचे


हाती असे तिरंगा प्रत्येक माणसाचे 

सुजलाम काम आहे विश्वात भारताचे


ही मातृभूमि आहे प्राणाहुनी जवळची

सारेच नाव घेती मानात भारताचे


प्रशांत कदम

मुंबई, 

९५९३५७२५५५,

२६~०१~२०२२.

प्रशांत गझल - राम राज्य सरले !!



 दु:ख आता फार झाले,  तरही गझल  ( नाव माहीत नाही ) 

वृत्त : मनोरमा  - लगावली : गालगागा गालगागा


राम राज्य आज सरले !! ()


बंद आता दार झाले

(दुःख आता फार झाले)


काय सांगू आज साध्या 

माणसांवर वार झाले


चूक ज्यांची मात्र नाही

तेच नाहक ठार झाले


आहुती ही आज घेता

राग अवघे गार झाले 


राम राज्य आज सरले

हे कथेचे सार झाले


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५,

२६~०१~२०२२.

प्रशांत गझल - जगा वेगळे मागणे ( )

 


जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

जरा वेगळे बोलणे मांडतो मी
(जगा वेगळे मागणे मागतो मी)

अधाशी पुढारी नको सांगतो मी
जगा सर्व वाटा असे सांगतो मी

अघोरी नको रे पुजारी कधीही
जना देत दानी रहा बोलतो मी

भयंकर नको रे शिकारी कधीही
दयावंत होता तया मानतो मी

कलंदर नको रे न ढोंगी कधीही
जगी सर्व सुंदर असे पाहतो मी

प्रशांत कदम,
मुंबई
२७~०१~२०२२,
९५९४५७२५५५


प्रशांत गझल - अर्थ जगण्याचा !!

 


गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त 

अर्थ जगण्याचा !!


भांडण उगाच करुनी, हसण्यात अर्थ नाही

त्रागा उगाच करुनी, जगण्यात अर्थ नाही


आयुष्य छान आहे, आनंद रोज घ्यावा

दिवसा गणीक तंटे, करण्यात अर्थ नाही


ध्येये समोर घ्यावी, श्रम ही तसे करावे

कामास देव माना, हरण्यात अर्थ नाही 


येईल ते स्विकारा, अल्पात हर्ष माना

निष्क्रीय होत केवळ, बसण्यात अर्थ नाही


संतुष्ट हेच मोठे, औषध जगावयाचे

कार्यात मग्न व्हावे, रुसण्यात अर्थ नाही.


प्रशांत कदम, 

९५९४५७२५५५,

२८~०१~२०२२.

प्रशांत गझल - सांज !!



 गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 

सांज !!

केंव्हा तरी मनाला, फुलवून सांज गेली

दिपले अजून डोळे, हरखून सांज गेली 


कळले मलाच तेंव्हा, आभाळ खास होते

थ॔डी तशी गुलाबी, भरवून सांज गेली


बोलू कसे कुणाला, हातात हात होते

ऊरात स्पंदनाना, फसवून सांज गेली


आकाशही बुडाले, अंधार दाट झाला

धूसर वसुंधरा ती, हरवून सांज गेली


कळले मला न तेंव्हा, फसलो मिठीत केंव्हा

मग ओढ शेवटाची, सजवून सांज गेली


प्रशांत कदम, 

मुंबई 

९५९४५७२५५५,

२८~०२~२०२२.

प्रशांत गझल - का असे !!

 


वृत्त - प्रेय
गाललगा गालगा गाललगा गालगा


का असे ?

आज मला सांग ना, भासवते का असे ?
राग मनी नसुन ही, दाखवते का असे ?

प्रेम तुझे आहे ते, दाखवना आज ते
बाज तुझा पाहता, जागवते का असे ?

पाठ मला कारणे, आहेत बघ कालची
राग फुका आणुनी, नाचवते का असे ?

तूच अता बोलना, घेत मला समजुनी
दु:ख पुरे, सोडना, साठवते का असे ?

लोभ कधी धरु नको, दान स्वता करत जा
मानवता का हवी ? जाणवते का असे ?

प्रशांत कदम,
मुंबई,
०१~०२~२०२२,
९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - सैनिक असा मी



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त.


सैनिक असा मी !!


रक्षण करीत आता, सीमेवरी उभा मी

दिनरात जागतो मी, देतो लढा खरा मी


देशास मानतो मी, शत्रूस मारतो मी

मातेस प्राण देतो, सैनिक हा असा मी


थंडी असो कि पाउस, पर्वा नसे कुणाची

शत्रूस दूर करणे, हा उचलला वसा मी


शिवराय देव माझे, त्यानाच जाणतो मी

देशाभिमान वाहे, तो मावळा जसा मी


हाती धरून तिरंगा, मानात चालतो मी

भूमीस मान देतो, सांभाळतो तसा मी


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५

०४~०२~२०२२.

प्रशांत गझल - रक्त माझे !!



 वृत्त - मंजूघोषा  

लगावली - गालगागा गालगागा गालगागा


रक्त माझे !!


खास काही, आज आधी सांगतो मी

कोण खोटे बोलला तर, भांडतो मी 


गोड वाणी आवडीने, बोलतो मी

सत्य माझे हिरहिरिने, मांडतो मी 


राग तंटे भेद सारे, सोडतांना 

सर्व धर्मी एकरंगी, बांधतो मी 


एकमेका जोडणे, हे काम माझे

भिन्न धर्मी, भिन्न जाती, सांधतो मी 


देश माझा सर्वश्रेष्ठी, मानतो मी

देश कार्या, रक्त माझे सांडतो मी


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

०५~०२~२०२२.

प्रशांत गझल - शब्द तुझे !!



मदनरंग (6/6/6/5)

शब्द तुझे !!


शब्द तुझे मोलाचे आठवतो आज ही 

प्रेरणा मना मध्ये जागवतो आज ही


उर्जा देती रोज नवी प्रेमाचे बोल ते

स्मृतिं मध्ये दिन रात्री घालवतो आज ही


किती निशा जागवल्या वाट तुझी पाहता

तुझ्या विना समई ही मालवतो आज ही


आस असे जाणवते येशी तू वाटते

तुज साठी रोज फुले मागवतो आज ही


मज असते चिंता ती हुरहुर ही जाळते 

तव क्षेमा पत्रे ही पाठवतो आज ही


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

०६~०३~२०२२.

प्रशांत गझल - लता दीदी



 गागालगा लगागा, गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त.

लतादीदी !!


सर्वांस आज दीदी, सोडून दूर गेली

सूरांस मात्र मागे, ठेवून दूर गेली


एकेक गीत सुंदर, भरपुर सुरेल गाणी

नाजुक स्वरांत मंजुळ, गावून दूर गेली


स्वर कोकिळा लता ती, भारत भु रत्न होती

सा-या जगास छ॔दी, बनवून दूर गेली


सैनिक जवान लढती, घेवून गान स्फुर्ती 

गायक महान दीदी, भुलवून दूर गेली 


स्वरांत गोडवा अन् , जादू तशीच होती 

देशास शान दीदी, जिंकून दूर गेली


प्रशांत कदम,

मुंबई, 

९५९४५७२५५५

०६~०२~२०२२.

Sunday, May 8, 2022

प्रशांत गझल - मोजू नकोस लाटा. ()



लगावली : गागालगा लगागा  गागालगा लगागा

आनंदकंद  वृत्त - तरही गझल () सागर निंबाळकर.


(मोजू नकोस लाटा येतात त्या निरंतर)

मोजू नकोस लाटा देतात तंत्र सुंदर 

देतात त्या जगाला जगवीत मंत्र सुंदर


येतात वादळे ही जातात ती उडूनी

लाटाच परत करती फिरवीत मंत्र सुंदर


घेईल समुद्र पोटी  देईल परत सारे

दावी अथांग प्रीती घडवीत मंत्र सुंदर


बघण्यास तू सखे ये लाटाच त्या किनारी

हसतात बघ कशा त्या जडवीत मंत्र सुंदर


म्हणतो प्रशांत लाटा आहेत प्रिय निरंतर 

देतात स्वर जगाला ऐकवित मंत्र सुंदर


प्रशांत कदम, 

१६~०९~२०२१ 

९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - मी ही तयार आहे.



आनंदकंद वृत्त - 

गागाल गालगागा गागाल गालगागा


मी ही तयार आहे !!


धंदे बरेच केले, बसलो कधीच नाही

व्यापार खूप केला, चुकलो कधीच नाही


अनुभव चिकार आले, तावून मी निघालो

धक्केच घेत शिकलो, थकलो कधीच नाही


मदतीस येत होतो, कोणास ही कधीही

नाही कधी न म्हटले, दमलो कधीच नाही


शेतात काम केले, धरणीस मानले, नी

मातीत रंगलो मी, हरलो कधीच नाही


देशास पाहिजे ते, सैनिक तरूण उमदे

मी ही तयार होतो, हटलो कधीच नाही


प्रशांत कदम 

०५~१०~२०२१.

९५९४५७२५५५.


Sunday, May 1, 2022

प्रशांत गझल - तू !!



वृत्त - जीवनलहरी (6/6)

तू !!


कधी कधी सजते तू

ह्रदयाला भिडते तू


प्रेमाने येत जसे

मना मधे हसते तू


राग कधी मौन कधी

संभ्रम ही करते तू


असा कसा स्वभाव हा

असेच का रुसते तू


तूच तरी आवडते

सदा मनी असते तू


@ प्रशांत कदम,

मुंबई 

३१~०१~२०२२.


प्रशांत गझल - भुई !!



लगालगा लगालगा लगालगा लगालगा - कलिंदनंदिनी

भुई !!  


हवा मनात गंध तो  सदा मनी वसेल जो

फुले जगात आणती सुगंध तो ठसेल जो


मनात धर्म पाहिजे जसा दिसे फुलां मधे

सदैव लीन राहतो विठू पुढे बसेल जो 


मनात शांतता हवी प्रसन्न बघ जगावया 

तरच मिळेल गोडवा मनात तो असेल जो


मजूर ते किती तरी भुईस वंचिले सदा

असेल तो धनी खरा अता भुई कसेल जो


मना मनात जागवा समानता व बंधुता 

घडेल त्यात देश मग हवा तसा हसेल जो 


कदम,

मुंबई, 

९५९४५७२५५५.

२९~०४~२०२२.


प्रशांत गझल - मैत्री !!



गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा


मैत्री !!


माणसांची प्रेम माया संपलेली पाहतो मी

एकमेकाशी सदोदित भांडताना पाहतो मी


काल होते खास वैरी आज मैत्री होत गेली

मित्रतेला जोडणा-या भावनेला मानतो मी 


छान असते फार मैत्री जोडते जी दोन ह्रदये 

प्रेरणा देई मनाला भेटता मग भारतो मी


जोडुनी एकेक मात्रा शेर माझा होत असतो 

मित्र ही मोती जणू ते गुंफताना आणतो मी


कोणताही स्वार्थ नसता साधलेली तीच मैत्री

जाणुनी हा मंत्र मोठा माणसांशी वागतो मी


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५,

०५~०४~२०२२.





प्रशांत गझल - गझल श्वास माझा !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 

गझल श्वास माझा !!

बोलू तरी कसा मी  गझलेस छंद माझा
ती प्राण वायु आहे श्वासास बंध माझा

माझी अशी सखी ती जीवास जीव देते
समवेत देत असते परमोच्चनंद माझा 

झाल्या किती परिक्षा होत्या सदैव माझ्या
आहे गझल तरीही मोठा प्रबंध माझा

आशय सदा असा हा गझलेतला फुलावा 
घेवून सर्व जागी पसरत सुगंध माझा

गझले विना अता मी जगणेच शक्य नाही
नसली गझल बरोबर तर श्वास बंद माझा

प्रशांत कदम, 
मुंबई, 
९५९४५७२५५५.
●