Tuesday, January 28, 2020

करेज इंडिया !!

करेज ईंडिया,!!

करेज ईडियाची स्थापना १९९८ ची,

खऱ्या अर्थाने धैर्यशील भारताची,

असे म्हणावयास हरकत कुठे आहे कुणाची 
सत्य साईंच्या आशिर्वादाने प्रेरीत
व्यंकटेश रावांनी स्थापीत ही सेवा भावी संस्था
कॅन्सरच्या रूग्णांना मदत करते सर्व प्रकारची,

फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर
देश भरातल्या गरजू व गरीबांना
पुरवली जाते सेवा औषधोपचारांची
कॅन्सर अन गंभीर आजारी रूग्णाना
दिली जाते वैद्यकिय मदत
केली जाते त्यांची सेवा हर तऱ्हेची,

प्रयत्न केला जातो त्यांचा प्रत्येक दिवस
आनंदात मौज मजेत जावा याचा
शिकवण दिली जाते मानसिक धैर्याची,
गंभीर आजारपणाला हसत हसत 
धैर्याने सामोरे जाण्याची 
आणि त्यातून सुखरूप बाहेर पडण्याची,

प्रशांत कदम .

त्रासदायक उपचार पद्धती ऐवजी
सांगितली जाते स्वस्त सरळ सोपी 
उपचार पद्धत अदभूत वेगळ्या धरतीची,
वैद्यकिय दृष्ट्या समजून घेतली जाते 
प्रकृती प्रत्येक रूग्णाची आणि
ठरविली जाते दिशा उत्तम उपचारांची

अवलंबिले जातात औषधोपचार
सूरवात केली जाते सहज सोप्या आयुर्वेदीक,
होमीओपथी उपचार पद्धतीची, 
केली जाते तपासणी साधला जातो संवाद 
कुटुंबिय, रूग्ण आणि डाॅक्टरांशी
जेंव्हा गरज असते मानसोपचाराची

करेज ईंडिया कडून केली जाते सेवा
दुर्धर रोगाने पीडीतांची
वृद्ध, अपंग आणि दिव्यांगजनांची,
गरजू अपंगा साठी विनामुल्य
केली जाते मदत व्हीलचेअर
रक्त दान आणि कृत्रिम हाता पायांची,

दिला जातो आधार, लावली जाते सवय
स्वताच्या हिमत्तीवर समर्थपणे 
समाजात ऊभे राहण्याची,
केले जाते निराकरण व निर्मुलन 
रूग्णांच्या विविध समस्यांचे
घेतली जाते काळजी त्यांच्या आरोग्याची

अशा सर्व रूग्णांना आवश्यकता असते
योग्य मानसिक संतुलनाची
समुपदेशनाची, पौष्टिक आहाराची,
सेवाभावी संस्थांकडून मदत घेत
‘ करेज ईंडिया ‘ तत्परतेने 
गरज भागवते अशा सर्व गोष्टींची

रूग्णांना आपले आजारपण 
विसरण्यास लावण्या साठी
करेज ईंडिया मदत घेते मनोरंजनाची
आयोजन करते कार्यक्रमांचे
विविध मनोरंजक करमणूकीचे अन् 
काळजी घेते त्यांचा तणाव कमी करण्याची

करेज ईंडियाच्या अशा सेवा भावी कृतीस
आम्हा सर्वांचा शतश: प्रणाम
प्रशंसनिय आहे पद्धत त्यांच्या कामाची
गरज आहे आपण सर्वांनी जमेल तसा
खारीचा वाटा उचलून मदत करून
‘ करेज ईंडियाला ‘ बलवान बनवण्याची

2 comments: