Saturday, January 25, 2020

मुग्धा !!

मुग्धा !!                                        
                                 
हट्टी आमची मुग्धा जरी
सोज्वळ सुंदर जशी परी
शिस्त लावू की कौतुक करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अवखळ तिचे वर्तन वाटे
निरागस परंतू बोलणे असे
ऐकत राहू की गप्प करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

दिपीकाची ती फॅन भारी
मनी,स्वप्नी तिलाच पाही
तिला आवरू की दुर्लक्ष करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अभ्यासात तिचे लक्ष नसे
टिव्हि मोबाईल मधे ती रमे
छडी घेऊ की रागे भरू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अभ्यासाचा आईचा ध्यास
तिचा मात्र वेगळाच अट्टाहास
बाजू घेऊ की शिक्षा करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

वादातून मग भांडण वाढे
पाठीवर आईचा धपाटा पडे
कोणास विचारू हे काय सूरू ?
कळीच होतंय फुलपाखरू

भांडून मुसमुसून होताच पुरे
आईच्या कुशीत हसतच शिरे
आईचे ममत्व अन् लाड सूरू
कळीच होतंय फुलपाखरू

शिकून सक्षम तिने व्हावे
जीवनात ही यशस्वी रहावे
या साठी आम्ही काय करू ?
कळीच होतंय फुलपाखरू  !!

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
१५-०५-२०१५..

Sent from my iPhone

1 comment: