Tuesday, January 28, 2020

करेज इंडिया !!

करेज ईंडिया,!!

करेज ईडियाची स्थापना १९९८ ची,

खऱ्या अर्थाने धैर्यशील भारताची,

असे म्हणावयास हरकत कुठे आहे कुणाची 
सत्य साईंच्या आशिर्वादाने प्रेरीत
व्यंकटेश रावांनी स्थापीत ही सेवा भावी संस्था
कॅन्सरच्या रूग्णांना मदत करते सर्व प्रकारची,

फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर
देश भरातल्या गरजू व गरीबांना
पुरवली जाते सेवा औषधोपचारांची
कॅन्सर अन गंभीर आजारी रूग्णाना
दिली जाते वैद्यकिय मदत
केली जाते त्यांची सेवा हर तऱ्हेची,

प्रयत्न केला जातो त्यांचा प्रत्येक दिवस
आनंदात मौज मजेत जावा याचा
शिकवण दिली जाते मानसिक धैर्याची,
गंभीर आजारपणाला हसत हसत 
धैर्याने सामोरे जाण्याची 
आणि त्यातून सुखरूप बाहेर पडण्याची,

प्रशांत कदम .

त्रासदायक उपचार पद्धती ऐवजी
सांगितली जाते स्वस्त सरळ सोपी 
उपचार पद्धत अदभूत वेगळ्या धरतीची,
वैद्यकिय दृष्ट्या समजून घेतली जाते 
प्रकृती प्रत्येक रूग्णाची आणि
ठरविली जाते दिशा उत्तम उपचारांची

अवलंबिले जातात औषधोपचार
सूरवात केली जाते सहज सोप्या आयुर्वेदीक,
होमीओपथी उपचार पद्धतीची, 
केली जाते तपासणी साधला जातो संवाद 
कुटुंबिय, रूग्ण आणि डाॅक्टरांशी
जेंव्हा गरज असते मानसोपचाराची

करेज ईंडिया कडून केली जाते सेवा
दुर्धर रोगाने पीडीतांची
वृद्ध, अपंग आणि दिव्यांगजनांची,
गरजू अपंगा साठी विनामुल्य
केली जाते मदत व्हीलचेअर
रक्त दान आणि कृत्रिम हाता पायांची,

दिला जातो आधार, लावली जाते सवय
स्वताच्या हिमत्तीवर समर्थपणे 
समाजात ऊभे राहण्याची,
केले जाते निराकरण व निर्मुलन 
रूग्णांच्या विविध समस्यांचे
घेतली जाते काळजी त्यांच्या आरोग्याची

अशा सर्व रूग्णांना आवश्यकता असते
योग्य मानसिक संतुलनाची
समुपदेशनाची, पौष्टिक आहाराची,
सेवाभावी संस्थांकडून मदत घेत
‘ करेज ईंडिया ‘ तत्परतेने 
गरज भागवते अशा सर्व गोष्टींची

रूग्णांना आपले आजारपण 
विसरण्यास लावण्या साठी
करेज ईंडिया मदत घेते मनोरंजनाची
आयोजन करते कार्यक्रमांचे
विविध मनोरंजक करमणूकीचे अन् 
काळजी घेते त्यांचा तणाव कमी करण्याची

करेज ईंडियाच्या अशा सेवा भावी कृतीस
आम्हा सर्वांचा शतश: प्रणाम
प्रशंसनिय आहे पद्धत त्यांच्या कामाची
गरज आहे आपण सर्वांनी जमेल तसा
खारीचा वाटा उचलून मदत करून
‘ करेज ईंडियाला ‘ बलवान बनवण्याची

Monday, January 27, 2020

अजूनही वेळ गेली नाही !!

अजूनही वेळ गेली नाही !!                  

अजूनही वेळ गेली नाही
तू काम केले नाहीस तरी
माझे काही अडणार नाही
तूझ्या काम न करण्याने
माझे काही बिघडणार नाही

पण अशा ह्या वागण्याने
होतोय परिणाम ग्राहक सेवेवर
आणि पर्यायाने तुझ्याच
संस्थेच्या भवितव्यावर

आज कदाचित मिळत असेल
जरी तुला पूर्ण पगार
पण भविष्यात काय ?
याचा देखील कर विचार

तुझ्या बेजबाबदार वागण्याने
ग्राहक घेतो काढतां पाय
तेच नसले तर काऊंटरवर
बसून करशील काय ?

आईवडिलांच्या पुण्याईने
श्रेष्ठिंच्या आशीर्वादाने
विनासायास मिळवलीस
ही सफेद काॅलरची नोकरी
त्याची तरी जाण ठेव
परिस्थितीचे भान ठेव

अजूनही वेळ गेलेली नाही
चल ऊठ आळस झटक
मी ही आहे तूझ्या सोबत
दोघे मिळून काम करू
तूझ्या सारख्या सगळ्यांनाच
काम करण्यास उद्युक्त करू
देवू चागली ग्राहक सेवा
संस्थेचं नाव रोशन करू

प्रशांत कदम,
9594572555.






धडधड !!

धडधड !!                                                    

चल चल 
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

दर रोज मला सध्या
आठवण तूझी येते
रात्र रात्र ती मला 
जागेच उगा ठेवते

काही सुचत नाही मला
जरा करमत नाही मना
आता कसे सावरू जीवा
सांग प्रिये तुझ्या वीना

माझ्या हृदयातील धड धड
बघ तुझाच जप करते

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

काल स्वप्नात तू दिसलीस
काही बोलत तू होतीस
जणू मनातीलच माझ्या
तराणेच ऐकवत बसलीस

बिलगून मला कधी
कवेत तू घेशील
हे भास सांग कधी
खरे कसे होतील

मी विचार करत राहतो
अन् आठवण तुझी काढतो

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

तूला वाटेल मी एवढे
का तुजवर प्रेम करतो
तू म्हणशील वेडा मला
मी तेही मान्य करतो

वेड्यांचे हे गुण सर्व
वेडेच तर जाणतील
मरण्यातली ती मजा
मजनू च समजू शकतील

तू अशीच भेटत रहा
स्वप्नातून सतत मला

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

प्रशांत कदम,
०४-०८-२०१७,
९५९४५७२५५५.










Sent from my iPhone

Saturday, January 25, 2020

मुंबई !!

मुंबई !!                                                              

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

भर भर कर यहां रोज युं आते है कंई लोग
बसने यहा, मंदिर मस्जिद चढाते है वों भोग
उनकी तम्मनाओंका आदर करना ही पडेगा
होती हो मुसिबत पर हमे सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

चलना भी नहीं मुमकिन, बच्चे कहा खेलें
हर बचे तुकडे पर यहां बस रहे है मोहल्ले
बची हुई जगह पर गुजारा करनाही पडेगा
होती अगर भीड पर हमे सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

गाडीयां तो यहां रुक रुक कर है चलती
पब्लीक यहां शांती से चल भी नहीं सकती
हवा भी तो यहां अब कार्बनकी हैं मिलती
बढते हुये प्रदुषण को युहीं सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

पेडोंकी जगह बन रहे है कांक्रीट के जंगल
गली गली शहर शहर बस हो रही है दंगल
अब कुछ नहीं कुशल यहाँ कुछ नहीं मंगल
बची हुई जींदगीको युहीं बिताना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

बारीश भी यहां आती है तो आती है जोरसे
बह जाते है सब रस्ते और होते है क‌‌ई हादसे
पब्लीक ही करती है फिर मदत अपने मनसे
ईन्सानियत ही तो दिखती है लोगोंकी शानसे

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२८-०६-२०१९.

भेट पहील्या पावसाची !!


भेट पहील्या पावसाची !!            

ती सांज ओली ओली
तो थंड थंड वारा
मीठी ती तूझी माझी
तो श्वास गंध न्यारा

आठवते मला अजुन ही
ती रम्य वेळ पावसाची
लख लख त्या विजांची
अन् धक धक ही ह्रदयांची

बिलगून होतीस तू मजला
विसरुन सर्व जगाला
आवर घालीत होतो
दोघेही आपल्या मनाला

भिजली तू चिंब होतीस
रिम झीम त्या सरींनी
तनं एकरुप झाली होती
मंतरलेल्या त्या क्षणांनी

पहील्या पावसाची ती
आगमनाची वेळ होती
अविस्मरणीय नात्याची
मिलनाची गळाभेट होती

प्रशांत कदम.
१२-०६-२०१९

९५९४५७२५५५.

ट्रायल रुम !!

ट्रायल रुम !!                                    

ट्रायल रुम च्या दरवाजा बाहेर
बिचारा नवरा होता ताटकळत
खांद्यावर लाईफस्टाईलची बैग
अन् मोबाईल वर होता खेळत

आजुबाजुला बायकांचा गराडा
हा संकोचाने उभा होता बिचारा
मधे मोबाईल मधुन मान काढत
गप बघत होता बाहेरचा नजारा

मधेच दरवाजात यायची ललना
शू शू करत नव-याला शोधायची
अंगावर चढवलेला नवीन ड्रेस
मुरडत येवून दाखवून जायची

वा किती छान, हा सैल, हा तंग
अशा अनेक कमेंट होता ऐकत
मोबाईल मध्ये खेळता खेळता
चोरुन बघत होता सगळी गम्मत

तेवढ्यात बायको आली दारावर
चढवून एक भन्नाट ड्रेस अंगावर
शू शू , अहो बघा तरी कशी दिसते
दोन शब्दांत नवरा आला भानावर

तिला बघुन त्याचे डोळे विस्फारले
नको, छी, छी त्याने मानेने दर्शवले
अहो असे काय करता नीट बघा तरी
तिने रागात त्याला जोरात फटकारले

त्या नंतरचा तिचा तो तिखट कटाक्ष
बघताच त्याने हसू आणले गालावर
मस्त खूपच छान दिसतोय तूझ्या वर
म्हणत लक्ष केंद्रित केले मोबाईलवर

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२३-०६-२०१९.

बरसून ये !!

  बरसून ये !!                         

कृष्ण मेघ पर्जन्याचे
येणार कधी अंबरात
वाट अशी पाहू किती
पावसाची अंगणात

नदी नाले शूष्क झाले
सरले पाणी जलाशयांत
तप्त सूर्य किरणे केवळ
तळपती आकाशात

लाही झाली सर्व अंगाची
चिंता क्रोध मना मनांत
पर्जन्या साठी करीती कुणी
यज्ञ उपासना देवळांत

नको क्रोध पावसा दाखवू
बरसून ये अंबरी लवकरात
तृष्णा तृप्त जल धारांनी
आनंद बहरु दे चराचरांत

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२४-०६-२०१९.

मुग्धा !!

मुग्धा !!                                        
                                 
हट्टी आमची मुग्धा जरी
सोज्वळ सुंदर जशी परी
शिस्त लावू की कौतुक करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अवखळ तिचे वर्तन वाटे
निरागस परंतू बोलणे असे
ऐकत राहू की गप्प करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

दिपीकाची ती फॅन भारी
मनी,स्वप्नी तिलाच पाही
तिला आवरू की दुर्लक्ष करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अभ्यासात तिचे लक्ष नसे
टिव्हि मोबाईल मधे ती रमे
छडी घेऊ की रागे भरू ?
कळीच होतंय फुलपाखरू

अभ्यासाचा आईचा ध्यास
तिचा मात्र वेगळाच अट्टाहास
बाजू घेऊ की शिक्षा करू ?
कळीच होतंय फुलपाखरू

वादातून मग भांडण वाढे
पाठीवर आईचा धपाटा पडे
कोणास विचारू हे काय सूरू ?
कळीच होतंय फुलपाखरू

भांडून मुसमुसून होताच पुरे
आईच्या कुशीत हसतच शिरे
आईचे ममत्व अन् लाड सूरू
कळीच होतंय फुलपाखरू

शिकून सक्षम तिने व्हावे
जीवनात ही यशस्वी रहावे
या साठी आम्ही काय करू ?
कळीच होतंय फुलपाखरू  !!

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
१५-०५-२०१५..

Sent from my iPhone

आयुष्य म्हणजे काय ?

आयुष्य म्हणजे काय ?

आयुष्य, आयुष्य म्हणजे
तरी काय असतं,
देवाने निर्माण केलेलं
एक सुंदर विश्व असतं,
कोमल अलुवार सुगंधित
तरंगणार फुल असतं,
निरागस निष्कलंक पणाने
अल्लडणार बालपण असतं,
अवखळ भरभर वाढणार
ते सदृढ मूल असतं,
तारुण्यातल्या नवचेतन
गर्मीतल ते बळ असतं,
संवेदनशील तारुण्यातल
सळ सळणारं रक्त असतं,
आशा आणि आकांक्षा समेत
मोहरणार यौवन असतं,
मित्र मैत्रिणी समवेत
विहरणार तारुण्य असतं,
जोडीदाराला शोधत
भिरभिरणार फुलपाखरू असतं,
आयुष्य हे खरंच न उमगणार
सुंदर स्वप्न असतं !
आयुष्य हे खरंच न उमगणार
सुंदर स्वप्न असतं !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
१४-०७-२०१९.

एम्स दशकपूर्ती !!

एम्स दशकपूर्ती !!

वर्षे दशक पूर्तीची
एम्स च्या निर्मितीची
प्रांजल मेहनतीची
प्रामाणिक कष्टांची

ऊद्दीष्टं समोर ठेवून
सूरवात केली ‌‌एम्सची
सहकाराच्या प्रेरणेतून
एका नव्या ऊद्योगाची

प्रांजलीची मेहनत
परिक्षा परिश्रमांची
अनुभवले चढ‌ऊतार
कसोटी चिकाटीची

आली किती संकटे
लक्षणे ती यशाची
धिराने पार केली
वर्षे ही दशकाची

आहे साथ सदैव
ऊत्तम सहका-यांची
आशिर्वाद पूर्ण सोबत
आप्त स्वकियांची

प्रेरणा अशीच लाभो
हित चिंतकांची
प्रगती होत राहो
एम्स असोसिएटसची !

प्रगती होत राहो
एम्स असोसिएटसची !

प्रशांत कदम,
०७-०७-२०१९.

नफरत !

नफरत !!
करते रहे तुम हमसे नफरत
और हो गया अचरज
दूर तो हम हो न सके
बस और पास हो गये

करते रहे हम प्यार तुम्हे
पुरे दिलो जानसे
भूला तो नहीं पा सके
बस और करिब आ गये

करते रहे तुम हमसे नफरत
और हो गया अचरज
दूर तो हम हो न सके
बस और पास हो गये

कहती रही दुनिया हमें
बस पागल और दिवाना
पर अन्जाम यहां उलटा हुआ
तुम मेरे ही हुये दिवाने

करते रहे तुम हमसे नफरत
और हो गया अचरज
दूर तो हम हो न सके
बस और पास हो गये

पूजते रहे हम सदा तुम्हे
महोबत का खुदा समजकर
मन्नत पुरी हो गयी
हैं उसीका यह असर

करते रहे तुम हमसे नफरत
और हो गया अचरज
दूर तो हम हो न सके
बस और पास हो गये

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२६-०७-२०१९.

असं का ?

असं का ?
                                                           
काय करायचं असतं आणि                                      
माणसं काय करुन बसतात
बोलायचं असतं महत्त्वाचं
नेमकं तेच का विसरुन जातात ?

फोनवरतीच वेळ सगळा
मुलं आपली घालवतात सतत
आई बापाने समजावलं तरी
ते त्यांना का नाही पटत ?

महागड्या दुकानांतून खरेदी
सर्वच करतात बिनदिक्कत
समाज कार्य करताना मात्र
सहसा कोणी का नाही दिसत ?

मोठेपणा मिरवण्या साठी
माणसं वायफळ असतात बोलत
कौटुंबिक संवाद साधण्यासाठी
कधि कुणी का नाहीं भेटत ?

सीमेवर वरती मरतो सैनिक
त्याचे नसते सोयर सुतक
क्रिकेट मध्ये गेली विकेट
तर ते एवढं का वाटत घातक ?

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
१४-०७-२०१९.

संध्या !!

संध्या आजचा दिवस खरंच
आमच्या साठी ही खास आहे,
आमच्या लाडक्या मिंट्या चा
आज वाढदिवस आहे,
तूला उदंड आयुष्य लाभो
हाच मनी ध्यास आहे,
तूझ्या सर्व ईच्छा आकांक्षा
पूर्ण व्हाव्यात ही सदिच्छा आहे,
सोनेरी दिनाच्या सोनेरी ‌क्षणांचा आनंद
तूला उत्तरोत्तर मिळो ही प्रार्थना आहे,
तू मनात आणि डोळ्यांत पाहिलेली
सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरोत ही ईच्छा आहे,
तूझ्या आवाजातील गोडवा खळाळत हास्य
सदैव बहरत राहो हीच मनोकामना आहे,
अशा सोन्यासारख्या बहीणीला वाढदिवसाच्या
आमच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

नातं मैत्रीचं !!

नातं मैत्रीचं !!                                      
                                                     
ह्रृदयातून निर्माण होत.                        
ते नात असत मैत्रीचं
अतुट बंधन बनवणारं
सख्य्या जीवा भावाचं

नात्यांची रुपे अनेक
परिचीत अन् बोलकी,
औपचारिक व जवळची
तर काही अबोलकी

पण सगळ्या नात्यांत
शाश्वत नात एकच
सोन्याहून पिवळ अस
जवळच नातं मैत्रीचं

जे थेट ह्रृदयातून येत
श्वासां सोबत जगतं
जगायला ही शिकवतं
मन आनंदी ठेवतं

चूकी करतांना अडवतं
योग्य मार्गदर्शन करतं
शेवटपर्यंत साथ देतं
ते असत नातं मैत्रीचं !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१८-११-२०१९.

भय !!

भय !!                                                  
मनात सतत वाटणारी चिंता
निर्माण करते ते असते भय
भित्या पाठी येतो ब्रम्हराक्षस
मग बिघडते जीवनाची लय

जीवनात अयशस्वी होणार
असे आपल्याला वाटू लागते
मग हृदयाची धडधड वाढते
अचानक मन भयग्रस्त होते

प्रेमाची ती उलटी परिभाषा
म्हणजे नकळत आलेले भय
ज्या गोष्टी आवडत नाहीत
त्यांचेच आपणास वाटते भय

अविश्र्वासा मुळे निर्माण होते
ते एक प्रकारचे भयच असते
जीवनात हवी असेल शिस्त
तर कायद्याचे भय हवे जास्त

भयाच्या निराकरणासाठी हवी
ध्यान साधना व मनाची शांती
मन मजबूत करण्याची गरज
अन् विश्र्वास निर्मितीची शक्ती

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१७-११-२०१९.

आजी तू फक्त प्रेमच कर !!

आजी तू फक्त प्रेमच कर
आणि कर खाऊ रूचकर

नातवंड आता झालीत मोठी
कोणी राहीलीत नाही छोटी

अभ्यास करा म्हणून नको छळू
त्यांचं त्यांनाच लागलंय कळू

दमून उगाच लागू नकोस पाठी
मोबाईल त्यांच्या आलेत  हाती

रीजवतात अन् शिकवतात तेच अती
त्याच्या पुढे त्यांना नाही दिसत नाती

आजी वाटेल तुला खरंच अगदी
घालावी त्यांनी फुगडी अन् लंगडी

तुझं ऐकण्याची ते नाही घेणार तसदी
सद्या मोबाईल त्यांचा झालाय सवंगडी

मोबाईल बघण्यात त्यांचा जातोय वेळ
त्यातच खेळताहेत ते त्यांचे सर्व खेळ

म्हणूनच आजी तू फक्त प्रेमच कर
वाईट वाटून घेऊ नको, फक्त आराम कर !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१५-१२-२०१९.

एक आठवण !!

एक आठवण !!

सदैव आठवणीत राहील,
आपल्या स्टोरी मिरर ची,
नाॅन स्टाॅप नोव्हेंबर स्पर्धा

लेखकांना मिळत राहीला,
ज्या मुळे लेखन करण्याचा,
एक उत्कृष्ठ अनुभव फर्डा

नवनवीन विषयांमुळे मिळत होती,
लेखकांच्या बुद्धीमत्तेला चालना,
रोज उघडत होता एक नवा पडदा

मिळत होते समाधान लेखकांना,
स्वताच्या प्रकाशित लेखनाचे,
आनंद होत होता पाहून प्रतिसादा

मिळत होते समाधान वाचून,
प्रतिस्पर्धकांचे वेग वेगळे लेखन,
पाहून बहरणारी साहित्य संपदा

अभिमान आम्हा स्टोरी मिररचा,
ज्यांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले
अन् आयोजित केली आगळी स्पर्धा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
३०-११-२०१९.

निसर्ग !!

निसर्ग !!

निसर्ग म्हणजे भूतलावरील पंचतत्व
पृथ्वी,जल,अग्नी, वायू,अन् आकाश

निसर्गाचे सारे सुरेख सौंदर्य डोंगर दरी
नदीनाले झाडे अन् ताऱ्यांचे अवकाश

समुद्राच्या विराट लाटा, नदीचा संगम
झुळझुळणारा वारा अन् फुले झकास

निसर्ग देत असतो नव नवी शिकवण
रात्र सरतेच अन् पुन्हा येतोच प्रकाश

आले अडथळे तरी वाहते नदी तद्वत
समस्या ही निपटाव्या न होता हताश

आधुनिकतेचा जरूर करावा विकास
पण निसर्गाचा मात्र थांबवावा वीनाश

निसर्ग आपला सखा सोबती अन् गुरु
चला मिळून सारे त्याचेच संवर्धन करु

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२९-०७-२०१९.

वेडात मराठे वीर दौडले सात !!

वेडात मराठे वीर दौडले सात !!

अत्याचारी बेहलोल खान
शरण आला अन् प्रतापरावांनी
त्याला मोठ्या मनाने सोडले
परंतू खान एहसान फरामोश निघाला
पुन्हा चाल करुन आला
अत्याचार करू लागला
राजांनी भडकून फर्मान मग सोडले
सोडले हो जी र दाजी रं जी जी

खानाला मारल्या शिवाय
मला दाखवू नका तोंड
राजांनी रागात सक्त फर्मान काढले
प्रतापराव बेचैन अती झाले
समशेर सरसावून ते बसले
संधीची वाट पाहू लागले
वाट पाहू लागले हो जी रं दाजी रं जी जी

खबर लागली प्रतापरावांना
नेसरीला खानाचा तळ लागला
मागचा पुढचा विचार त्यांनी सोडला
समशेर त्यांनी वर उचलली
हर हर महादेव म्हणत
घोड्यावर टाच त्यांनी मारली
टाच त्यांनी मारली हो जी रं दाजी रं जी जी

पाहून अवतारी आपला सरदार
विसाजी,दिपोजी, विठ्ठृल,कृष्णाजी
सिद्धी, विठोजी निघाले, सरदारां सोबत
हजारों सैनिकांवर चालून गेले
पराकोटीची स्वामी निष्ठा दाखवत
वेडात लढले ते शूर वीर सात
शूर वीर सात हो जी रं दाजी रं जी जी

मराठ्यांचे मराठे पण
ज्या सात मराठयांना कळले
ते शूर वीर राजांच्या हुकूमावर
बेहलोल खानाला मारण्यास
त्वरीत सज्ज  जाहले
हर हर महादेव म्हणत
वेडात खरेच दौडले
मरणास सामोरे गेले
मरणास सामोरे गेले हो जी रं दाजी रं जी जी

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२८-११-२०१९.

परी !!

परी !!

कुटुंबात कितीही असली माणसे जरी
असायला हवी एक सुंदर नाजूक परी
तिचे अल्लड, अवखळ, खोडकर वागणे
तिचे सुंदर, रेखीव, आणि नाजूक दिसणे
तिचे गोड,मंद, कधी खळखळून हसणे
तिचे हळु, लाडिक, कधी रागावून बोलणे
वाटतं तिच्या कडे नुसतं पाहत बसावं
वाटतं तिचं लाघवी बोलणं ऐकत रहावं
परी प्रमाणे तिचं ते मनमोहक सौंदर्य
तिच्या स्वभावातील अनमोल औदार्य
मुलीच्या स्वभावातील अशी विविधता
आयुष्यात प्रत्येकाला यावी अनुभवता
नाजूक तूकडा आई बाबांच्या काळजाचा
वरदहस्त असतो सदैव तिच्यावर लक्ष्मीचा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२७-१९-२०१९.

जेष्ठ नागरिक !!

जेष्ठ नागरिक !!

आयुष्यभर करून काबाडकष्ट
अनुभवी नागरिक ह़ोतात जेष्ठ

अनेकांना वाटते आता आराम
नाही चिंता, आता फक्त विश्राम

पण असेच काहीही घडत नाही
आणि समाधान ही मिळत नाही

उलट निवृत्ती नंतरच्या समस्यांशी
जुळवायची समस्या लागते पाठीशी

जुळवावे लागते बदललेल्या परिस्थितीशी
जुळवावे लागते बदललेल्या हवामानाशी

योग्य आहारही लागतोय ठेवायला
पुरेसा व्यायाम लागतोय करायला

नियमित औषधे लागतातच घ्यावी
शरीरालाही विश्रांती लागतेच द्यावी

स्वताला आनंदी लागतंय रहायला
इतरांनाही आनंद लागतोय द्यायला

तेच जेष्ठ नागरिक खूष राहू शकतात
जे लहान थोर सर्वांशी जुळवून घेतात

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२६-११-२०१९.

सौंदर्य आणि फॅशन !!

सौंदर्य आणि फॅशन !!

हल्ली युवतींच सौंदर्य
जरा जास्तच खुलतं
मोबाइलच्या सेल्फीवर

वेगवेगळ्या पोझ मध्ये
मुरडत बाऊटस देत
कनेक्ट होत स्क्रीनवर

नवी फॅशन नवे कपडे
हात वर सेल्फीमुळे
ललना फिरती चोहीकडे

सोबत तयांच्या मागे पुढे
पर्स बॅग्स सांभाळत
नवरे दिसती बापुडे

इंटरनेट वरुनच मिळतात
सौंदर्य प्रसाधनाच्या टिप्स
मेकअप करण्याचे प्रकार

विविध जाहीरातीं द्वारे
कळतात फॅशनचे नवे ट्रेंड
मग त्या पोशाखांचा प्रसार

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२५-११-२०१९.

गुरु चे महत्त्व !!

गुरु चे महत्त्व !!

गुरू करीत
असे सर्वां साक्षर
गुरू भासे
जणू परमेश्र्वर

गुरू विना
जरी नाही मोक्ष
तोचि ठेवी
शिष्यांवर लक्ष

बालपणी आईची
ती अमृतवाणी
बोल तिचेच
तर  होते कानी

बोल बोबडे
बाल बोलणी
सहज शिकवली
मंजुळ वाणी

नाही उमगलो
नाही समजलो
बोट धरून आईचे
कधी चालू लागलो

गुरु म्हणून
आईच खरोखरी
आईची ही
किमया न्यारी

तरूणपणी ते
होते गुरूकुल
विद्यालयातील ते
गुरुवर्य अनुकूल

शिकवत होते
विषय ही सगळे
ज्ञान अगाध
मज दिले आगळे

गुरू जनांना
मी वंदन करितो
मोल तयांचे
जीवनी मानतो

प्रशांत कदम,़
९५९४५७२५५५
२४-११-२०१९.

सामाजिक विषय !!

सामाजिक विषय !!

बहुसंख्य लोकांना भेडसावतात
सामाजिक समस्या त्याच असतात
गरीबी बेकारी आर्थिक विषमता
अशा असतात सामान्यांच्या चिंता

समाजात बेकारी भरमसाठ आहे वाढत
बेरोजगारीमुळे व्यसनाधीनता आहे वाढत
लघु उद्योग, कुटीर उद्योग बंद आहेत
कुशल अकुशल कामगार बसून आहेत

अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत
गरजा ही पूर्ण करता येत नाहीत
गरीबी दारिद्य्र आहे वाढत
आर्थिक मागासलेपण आहे वाढत

म्हणूनच हवी लोकसंख्या नियंत्रित
विकास ही करावा लागेल कृषी क्षेत्रात
शिक्षणाचा प्रसार करावयासच हवा
भ्रष्टाचाराचा नायनाट व्हायलाच हवा

दूर करावी लागेल आर्थिक विषमता
बेरोजगारांना द्यावा मासिक भत्ता
वाढवावी लागेल रोजगार उपलब्धता
तेंव्हां समाधानी होईल सामान्य जनता

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२३-११-२०१९.

शौर्य साहस !!

शौर्य साहस !!

सद्या शौर्य साहस म्हटले
की एकच नाव येते पुढे
अर्थातच भारतीय वायू सेनेचे
अन् विंग कमांडर अभिनंदनचे

पाकिस्तानी भ्याड हवाई हल्ला
परतवण्यास प्रती हल्ला होता योजला
निवडले विंग कमांडर अभिनंदनला
अन् दिला चढाई करण्याचा सल्ला

नीडर कमांडर अभिनंदन पेटून उठले
पाकचे एफ १६ विमान खाली पाडले
जैश ए मोहोब्बतची दहशत संपवली
अन् आतंकवादी मनसुबे हाणून पाडले

पाक हल्यांचा प्रतिकार करताना
अभिनंदन यांचे ही विमान धडकले
पेराशूट द्वारे उतरतांना ते भरकटले
अन् पाकव्याप्त परिसरात अडकले

अभिनंदन शत्रूच्या तावडीत सापडले
अन् सगळे भारतीय चिंताग्रस्त झाले
पाकवर भारताने योग्य दबाव टाकाला
अन् त्यांना अभिनंदनला सोडावे लागले

सलाम अभिनंदनच्या साहसाला शौर्याला
प्राणपणाने लढणा-या वायुसेनेच्या वीराला
अभिनंदनच्या पराक्रमाचे कौतुक झाले
अन् सरकारने वीर चक्राने सन्मानीत केले

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२२-११-२०१९.

कन्यादान !

कन्यादान !

मन बापाच हुरहुरू लागतय
जसं लेकरू त्याच वयात येतय
लेक लाडाची मोठी होतेय
ह्रदयी धडधड वाढू लागतेय

आठवणींच्या हिंदोळ्यांवर
लेकीचे बालपण सरकतेय
अल्लड निरागस मुरडणे
छान नटणे डोळ्यात तरळतेय

लेकीचे लाघवी बोलणे
खळखळून हसणे आठवतेय
अन् तिच  कूळ उजवायच्या
कल्पनेने डोळ्यांत पाणी दाटतेय

लेकीस योग्य वर शोधून
सुखी संसारात सोडायचय
कन्यादानाच्या चिंतेनेच तर
मन देखील गहीवरलय

परक्या घरी पाठवणी नंतर
एकाकीपण येवू नये वाटतय
नेहमी प्रेम, सदभाव, सदाचार
मिळण्याची चिंता ग्रासतेय

कन्यादानाच हेच तर शल्य
पित्याच्या मनात सलतय
वियोगाच्या जाणिवेनेच तर
बापाच ह्रदय आक्रंदतय !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२१-११-२०१९.

प्रेम म्हणजे काय असतं !!

प्रेम म्हणजे काय असतं !!

प्रेम म्हणजे काय असतं
हे समजणं ही कठीण जातं

नि:शब्द, निरागस,अव्यक्त
अस ही प्रेम असू शकतं

अलुवार, गोड, नि:खळ
अस ही प्रेम भासू शकतं

नि:स्वार्थी, निर्भेळ, निर्मळ
अस ही प्रेम वाटू शकतं

प्रेम म्हणजे खरंच प्रेम असतं
रूढार्थाने ते असत सहज सोपं

कधी ही, कोणावर ही, कसं ही ते होतं
‌अचानक, अजाणतेपणी, केंव्हा ही होतं

प्रेम रंग, रूप, जात, पात, धर्म
या पासून परे, अलीप्त असतं

प्रेम निभावणं जेवढं कठीण असतं
प्रेम भंग पचवणं त्याहून कठीण जात

प्रेम म्हणजे दोन जीवांची तगमग
प्रेम म्हणजे दोन जीवां मधली हुर हुर

प्रेम कधी एकाकी एकतर्फी होत
वेड लागल्यागत अव्याहत रहातं

प्रेम म्हणजे अनमोल प्रेम असतं
सगळ्यांचं साठी सारखंच असतं

प्रेम अनाकलनीय अनुभुती असते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
निःसंकोचपणे अनुभवायची असते !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२०-११-२०१९.

स्त्री एक प्रेरणा !!

स्त्री एक प्रेरणा !!

स्त्री एक प्रेरणा
विविध रुपात दिसते
हृदयाच्या कप्प्यात
घर करून बसते

आयुष्यात सर्व प्रथम
आई बनून येते
बोटाला धरून
चालायला शिकवते

योग्य संस्कार करुन
जगण्या लायक बनवते
माया करते मुलांवर
प्रेरणादायी राहते

लग्न झाल्यावर स्त्री
पत्नी चे स्थान घेते
नव-यावर प्रेम असते
घर संसार चालवते

संसार सुखा साठी
अपार कष्ट करते
नव-याचे, मुलांचे
प्रेरणा स्थान बनते

सुंदर, तेजस्वी, कणखर
सय्यमी परंतु सोज्वळ
शूर, पराक्रमी, निग्रही
अभिमानी तरीही प्रेमळ

अशा अनेक रुपांत
वावरत असते स्त्री
कर्तृत्ववान गुणांमुळे 
प्रेरणादायी होते स्त्री

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१९-११-२०१९.

नातं मैत्रीचं !!

नातं मैत्रीचं !!

ह्रृदयातून निर्माण होत
ते नात असत मैत्रीचं
अतुट बंधन बनवणारं
सख्य्या जीवा भावाचं

नात्यांची रुपे अनेक
परिचीत अन् बोलकी,
औपचारिक व जवळची
तर काही अबोलकी

पण सगळ्या नात्यांत
शाश्वत नात एकच
सोन्याहून पिवळ अस
जवळच नातं मैत्रीचं

जे थेट ह्रृदयातून येत
श्वासां सोबत जगतं
जगायला ही शिकवतं
मन आनंदी ठेवतं

चूकी करतांना अडवतं
योग्य मार्गदर्शन करतं
शेवटपर्यंत साथ देतं
ते असत नातं मैत्रीचं !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१८-११-२०१९.

जाणता राजा !!

जाणता राजा !!

ऊर अभिमानाने भरून येतो
नुसतं नाव घेता महाराजांचे

धर्मनिरपेक्ष राजकर्ते तसेच
दूरदृष्टी असणारे होते राजे

सुघटीत संघटक, प्रशासक
अशी राजांची होती ख्याती

अष्टपैलू, सामर्थ्यवान, निग्रही
लोकाभिमुख अन् होते योगी

चारित्र्यसंपन्न, थोर, मुत्सद्दी
आदर्श राज्यकर्ते होते छत्रपती

नव्हता आळस, होता उत्साह
नव्हता स्वार्थ, होता परमार्थ

असे होते उमदे, शूर, कर्तृत्ववान
छत्रपती शिवाजी महाराज महान

रयतेचा रक्षक, धीरोदात्त राजा
रयतेचा लाडका, जाणता राजा !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१६-११-२०१९.

भय !!

भय !!

मनात सतत वाटणारी चिंता
निर्माण करते ते असते भय
भित्या पाठी येतो ब्रम्हराक्षस
मग बिघडते जीवनाची लय

जीवनात अयशस्वी होणार
असे आपल्याला वाटू लागते
मग हृदयाची धडधड वाढते
अचानक मन भयग्रस्त होते

प्रेमाची ती उलटी परिभाषा
म्हणजे नकळत आलेले भय
ज्या गोष्टी आवडत नाहीत
त्यांचेच आपणास वाटते भय

अविश्र्वासा मुळे निर्माण होते
ते एक प्रकारचे भयच असते
जीवनात हवी असेल शिस्त
तर कायद्याचे भय हवे जास्त

भयाच्या निराकरणासाठी हवी
ध्यान साधना व मनाची शांती
मन मजबूत करण्याची गरज
अन् विश्र्वास निर्मितीची शक्ती

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१७-११-२०१९.

दुष्काळ एक मोठी समस्या !!

दुष्काळ एक मोठी समस्या !!

दुष्काळ म्हणजे खरे तर
नाही निसर्गाचा प्रकोप
हा तर आहे मानवी
अमानवीय वृत्तीचा प्रताप

आवश्यक तेवढी होत नाही
ब-याच वर्षी पर्जन्यवृष्टी
पण मानवाची ही आहे चुकी
त्याने कुठे ठेवली दूरदृष्टी

पर्जन्यवृष्टी जेंव्हा झाली
तेंव्हा साठवलं नाही पाणी
आता पिण्याच्या पाण्यासाठी
डोळ्यात येतंय पाणी

घातले नाहीत बांध बंधारे
जिरवलं ही नाही पाणी
वृक्ष तोड थांबविली नाही
नाही केली नवी रोपणी

कौंक्रिटी करण,जंगल तोडीने
निसर्गाचे होतेय नुकसान
पर्जन्यवृष्टीच थांबल्या मुळे
शेतक-यांचे गळतेय अवसान

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१५-११-२०१९.

अंधश्रद्धा !!

अंधश्रद्धा

बुवाबाजी, भोंदूगिरी,
जादू टोना, काळी जादू
आहेत सर्व अशाश्वत गोष्टी
ज्यांची ना हमी ना शाश्र्वती
त्यात अडकल्यास  होणार
हमखास फसगती

अशाश्वत गोष्टींवर विश्वास
म्हणजे फक्त अंधश्रद्धा
निव्वळ आंधळा विश्वास
समाजाला लागलेली कीडच
लोकांच्या असाह्यतेचा
नाहक घेतलेला गैरफायदा

म्हणूनच करुया अंधश्रद्धेचे निर्मूलन
हवे अघोरी रुढी, प्रथांचे ऊच्चाटन
श्रद्धा जरुर ठेवूया पण शाश्वत गोष्टींवर
तर्क आणि विज्ञानाने तपासणी करुन
चला होवू सर्व जागरूक अन् संघटीत
अन् करुया अंधश्रद्धेचे समूळ निर्मूलन

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०४-११-२०१९.

माझा छंद !!

माझा छंद !!

काही कळेना कसा लागला
लिहीण्याचा हा छंद मला
ऊतरूनी येती कागदा वरती
शब्दफुलांच्या कुंद कळ्या

विविध रंगी विविध छटांच्या
वैचारीक  विषयांच्या वर्णमाला
अती आनंद सहज आणती
स्पर्शुनी जाती त्या हृदयाला

कणखर कधि मृदु लोण्याहूनही
आक्रमक शृंगारीक शब्द माला
प्रसन्न करती कधि हसवीती
उत्तेजीत करती क्षणात मनाला

सहज प्रसवूनी बहर आणती
शब्द शब्द गंफुनी मोती माला
विचार मनातील सर्व खुलवती
निर्मिती नव नवीन काव्य माला

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
०२-११-२०१९.
———————————————————————————————————-
English Translation
My hobby !!


 How did it feel?

 This hobby of writing to me

 Slow down on paper

 Blossom buds of the word flower


 Different shades of different colors

 The alphabet of ideological topics

 It brings so much happiness

 Tactile breeds to that heart


 Harder than soft butter

 Aggressive eroticism

 Smiles when happy

 In a moment of excitement


 Easy childbirth brings bliss

 Word is the word Gumfuni pearl garland

 Thoughts open all the mind

 The creation of the new poetic garland


 Pacific steps







जीवन एक रंगभूमी !!

जीवन एक रंगभूमी !!

जीवन एक रंगभूमी
म्हणजे दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नाव

रंगमंचावर एकामागून एक
पात्रे आपली वाक्य बोलतात
पहिले जातात दुसरे येतात

वाद होतात संवाद होतात
हसणे होते, रडणे होते
गाणे होते, नाचणे होते

एका पाठोपाठ एक
सगळं शिस्तीत चालत राहतं
एकमेकांना पूरक असत

जीवनात ही असच घडतं
आनंद, दुःख येतच असत
राग, लोभ येतात जातात

नाती गोती तयार होतात
आई वडील, पती पत्नी
भाऊ बहिण, काका काकी

नाती जपायची असतात
एकमेकांना देवून साथ
स्नेहांकित करावी लागतात

संबंध जोडले जातात
काही तुटतात, नवे होतात
भावबंध नाती फुलवतात

म्हणून विवीध रंग भरावे जीवनी
जगावे कल्पना करूनी मनी
जीवन एक रंगभूमी मानुनी

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०८-११-२०१९.

प्रवास !!

प्रवास !!

प्रवास म्हणजे आनंद,
मनसोक्त विहरणे,
अमर्याद गप्पा,
मस्त निखळ प्रेम,
सृष्टी सौंदर्याचे दर्शन
मौज,मजा, खेळ,
अमर्याद गायन

प्रवास म्हणजे नवीन ठिकाण
आप्तां सोबत सहभोजन,
चमचमीत जेवण,
नवीन माणसांची ओळख
नवीन भाषेचा परिचय
नव्या संस्कृतीची देवाण-घेवाण
नव्या अनुभूतिंचा संचय

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०९-११-२०१९.

आईच्या छायेत !

आईच्या छायेत !

असे वाटते सतत रहावे
आईंच्या छायेत
एक अनोखे वात्सल्य दिसते
आईंच्या मायेत

प्रेम आईचे लेकरांवर सारखे
सदोदित राहते
स्वता उपाशीपोटी राहून
आधी मुलांना खावू घालते

आई मुलांना बोटाला धरून
चालायला शिकवते
मुलं आजारी पडली तरं
रात्र रात्र जागते

बालमनावर छान चांगले
संस्कार आई करते
चूक झाली काही मुलांची
तर धपाटे ही मारते

छान चवीचे जेवण रुचकर
आईचेच तर असते
मुलांच्या प्रगती साठी नेहमी
आईच फक्त झुरते

म्हणूनच वाटते सतत रहावे
आईंच्या छायेत
एक अनोखे वात्सल्य दिसते
आईंच्या मायेत

प्रशांत कदम,
९५९४५६२५५५,
१३-११-२०१९.
------------------------------------------------------------------
English Translation
In the shadow of the mother!


 It seems to be persistent

 In the shadow of mothers

 Looks like a unique compliment

 In the love of mothers


 Love is like a mother's child

 Always remains

 By staying hungry

 Feeds children first


 Mother holding baby children

 Teaches you to walk

 If the kids get sick

 Waking up at night


 Pretty good on baby

 The rite is done by the mother

 Some children went wrong

 So the flames also kill


 Good tasting meal delicious

 It is the mother

 Always for the progress of the children

 Mother only wrinkles


 That is why it seems to be persistent

 In the shadow of mothers

 Looks like a unique compliment

 In the love of mothers


 Pacific steps,

 ९ ५ ९ ४५६२५५५,

 २०१९-११-२०१९.


माझे बालपण !

माझे बालपण !

अल्लड अवखळ
असेच होते माझे बालपण
सतत अजुनही
येतच असते त्याची आठवण

हट्टी, खोडकर
स्वभाव होता माझा भयंकर
इथून तिथे नाचून
दमवायचो मी आईला दिवसभर

खेळ मैदानी
सतत खेळायचो मित्रां बरोबर
मौज मजेचे
असेच होते बालपण खरोखर

ताशेरे तक्रारी
घरी यायच्या सदोदित नव्या नव्या
आई बाबा
भरायचे रागे तरी वाटायच्या हव्या हव्या

कधी कधी
वाटते उगाच आले हे मोठेपण
पुन्हा एकदा
यावे असे वाटते रम्य ते बालपण !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१४-११-२०१९.

गड किल्ले !

गड किल्ले !

गड किल्ले महाराष्ट्राचे
देतात दाखले शिवरायांचे
इतिहास जागवती शूर मराठ्यांचे
शूर मराठ्यांचे हो जी जी जी जी

शिवनेरी वर शिवबांचा
जन्म जाहला
जिंकण्यासाठी कठीण
शिवनेरी गड किल्ला
शिवरायांनी केला त्याचा
पूर्ण बालेकिल्ला हो जी जी जी जी

तोरणा एक  गड किल्ला
सह्याद्रीच्या कुशीतला
राजांना भारी आवडलेला
जिंकण्याचा मनसुबा केलेला
पहिलाच तोरणा किल्ला
राजांनी तो सहज सर केला हो जी जी जी जी

राजगड अती दुर्गम असा किल्ला
राजांनी राजधानी साठी होता योजीला
राज्य विस्तारा साठी याचा उपयोग झाला
महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवला
असा राजेशाही राजगड किल्ला हो जी जी जी

रायगड, डोंगर मुलखातील हा किल्ला
शिव छत्रपतींचा राज्याभिषेक येथे जाहला
शिवरायांनी राजधानी म्हणून त्यास गौरविला
सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा,पुरंदर किल्ला
विजयदुर्ग, मुरुड जंजिरा जलदुर्ग त्यानी बांधीला
गडकिल्ल्यांनी स्वराज्याचा पाया रोविला
पाया रोविला हो जी जी जी जी

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१२-११-२०१९.

माझा बाप शेतकरी !

माझा बाप शेतकरी !

माझा बाप शेतकरी
त्याचे उपकार माझ्या वरी
मला भासतो बाप माझा
देवाहून ही लय भारी

जगात मी मिरवितो
त्याचेच लावूनीया नाव
अभिमान मला त्याचा
आईला ही आहे ठाव

त्यानं शिकवले मला
मेहनत मजदूरी करुन
दिले मला सर्व काही
स्वता अर्धपोटी राहून

शेती काम अजून करतो
वेगवेगळी पीक घेतो
उन्हातान्हात राब राबतो
लोकांसाठी धान्य पिकवतो

काळ्या आईची करावी सेवा
अशी शिकवण त्यांने दिली
दूस-यां साठी करत रहावे
याचीही मला जाणीव दिली

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
११-११-२०१९.

आजच्या काळा पुढील प्रश्र्न !!

आजच्या काळा पुढील प्रश्र्न !!

आजचा एक गहन प्रश्न आहे तो महागाईचा
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीचा
वाढत नाहीत सामान्यांचे पगार आणि ऊत्पन्न
मात्र खिशाला परवडेनासे झाले धान्य न अन्न

महागाई सोबत वाढतो आहे देशात भ्रष्टाचार
पैसे दिले तरच कामे होतील असा अविचार
भ्रष्टाचार रुजला आहे वर पासून खाल पर्यंत
आणि चालू राहणार समाजाच्या अंता पर्यंत

दहशतवाद हा नवा प्रश्र्न देशाला सतावतोय
परकीय शत्रू देश विरोधी कारवाया करतोय
तरुणांना चिथावून देत दहशतवादी बनवतोय
अराजकता माजवतोय व शांती भंग करतोय

महागाई, भ्रष्टाचारामुळे उपासमारी वाढली
शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या वाढली
बेकारी,गरीबी,आर्थिक असमानता वाढली
अन् सर्वांवर उत्तर शोधण्याची गरज वाढली

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
१०-११-२०१९.

तो पाऊस !!

तो पाऊस जो नेहमीच खूप सूखावतो
जो उन्हाळ्यात तप्तते पासून वाचवतो
आल्हाद देणारा तो पहिला पाऊस
शांत संतत सतत असा बरसणारा
संपूर्ण सृष्टी हिरवीगार करणारा
चातुर्मासातील तो मनोहारी पाऊस
तो पाऊस खरच असतो सुखावणारा
मना मनांत नवं चैतन्य जागविणारा

तो पाऊस जो ढगफुटीत कोसळणारा
आक्रस्थाळेपणे येवून रौद्र रूप घेणारा
संकटाची चाहूल दाखविणारा असतो
महापूर,महामारी,ओला दुष्काळ आणतो
सर्वांनाच खूप भयभीत करणारा असतो
खरंच अगदी नको नकोसा वाटतो
कधी पडू नये, बरसू नये असच वाटतो
असा घाबरवून सोडणारा पाऊस असतो

तो पाऊस जो अवेळी अचानक बरसतो
तयार झालेल्या पिकांची नासाडी करतो
बळीराजाचे अतोनात नुकसान करतो
चाकरमानी ना अचानक येऊन भिजवतो
पूर्व आयोजित कार्यक्रमांची वाट लावतो
लहान थोर मंडळींची फजीती उडवतो
अशी ही पावसाची रुपे आपण अनुभवतो
कधी सुखावणारा, कधी घाबरवणारा, तर
कधी फजीती करणारा तरी ही नेहमीच
हवा हवासा वाटणारा असतो तो पाऊस !

‌प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०७-११-२०१९.

श्रमाचे महत्त्व !!


श्रमाचे महत्त्व !!
श्रम म्हणजे मेहनत, परिश्रम
मेहनतीला नाही पर्याय
जीवनात यशस्वी होण्यासाठी
मूलभूत गोष्ट नाही श्रमा शिवाय
श्रमा शिवाय यश नक्कीच अशक्य
सुसंगत प्रयत्नानेच होते यश शक्य
शरीर स्वास्थ्या साठी देखील
श्रम करतात नेहमी सहाय्य
बौध्दिक श्रमा इतकेच
शारीरीक श्रम ही अपरिहार्य
राजवाडा असो घर असो
वा असो आश्रम
त्यांच्या उभारणीसाठी लागतात
कठोर शारीरीक परिश्रम
मोल असते अनमोल श्रमांचे
ऐश आराम काय कामांचे
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०६-११-२०१९.

महाराष्ट्राची संस्कृती !!

महाराष्ट्राची संस्कृती !!

विशाल. व समृध्द आहे महाराष्ट्राची संस्कृती
संत महंतांची आहे त्यात अनमोल महती
ज्यांनी सदैव दिली सदाचाराची शिकवण
वर्ण, धर्म भेद मोडून केली समतेची भलामण

महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहे श्रध्देला महत्त्व
आठवड्याचा प्रत्येक वार ठरला आहे देवांचा
वेगळेपण जपले आहे प्रत्येक सणा वाराचे
पोषाखातूनही दर्शन होते रिती रिवाजांचे

संगीताची ही परंपरा आहे विशीष्ठ वेगळी
आदर राखला जातो येथे प्रत्येक धर्माचा
माणूसकी जपली जाते येथे मना मनातुन
संस्कृतीचा अभिमान आहे ह्रृदया ह्रृदयांतून

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०१-११-२०१९

ग्रामीण भारत !!

ग्रामीण भारत

भारता सारख्या विकसनशील देशांला
आवश्यकता आहे ग्रामीण विकासाची
ग्राम जनतेला देवून आधुनिक दृष्टिकोन
काळजी घ्यावी त्यांच्या आर्थिक विकासाची

अनेक गावांत अभाव आहे रस्त्यांचा
पिण्याच्या पाण्याचा, पथ दिव्यांचा
समस्या आहे सांड पाण्याची
नाले सफाईची, अस्वच्छतेची

आवश्यकता आहे समस्या दूर करण्याची
गावा गावात किमान सुविधा पुरविण्याची
सत्तर टक्के जनता राहते ग्रामीण भागात
करावा विकास व ठेवावे त्यांना आनंदात

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०५-११-२०१९.

मराठी असे आमुची माय बोली !

मराठी असे आमुची माय बोली
अभिमान आम्हा आमच्या भाषेचा
प्रत्येक शब्द अन् शब्द या भाषेचा
अमृततुल्य वंदनीय अन् देव वाणीचा

उगम भाषेचे पुरातन रामायणातील
महाभारतातील अन् शिवकालातील
आचार,विचार,उच्चार समृद्ध त‌याचे
शास्त्र,विज्ञान,ललित विषय जाज्वल्यतेचे

रामदासांचे श्र्लोक, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
तुकारामांचे अभंग, गदिमां चे शब्द सूर
विविध शब्द साहित्याने समृद्ध लोक भाषा
अमृता हुनी गोड अशी आमची माय भाषा

गौरवशाली परंपरा, संस्कृती जपणारी
ओजस्वी समृद्धशाली आमची माय बोली
प्रचार आणि प्रसार करुया मराठी भाषेचा
अभिमान बाळगुया आपल्या माय बोलीचा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०३-११-२०१९