Wednesday, March 20, 2019

आरक्षण !

आरक्षण !!

खूप केला देशाने विकास
स्वातंत्र्योतर सत्तर वर्षांत
देश झाला आपला समृद्ध
संविधानास राहून कटिबद्ध

विरून गेली अस्पृश्यता
समाज झाला शिक्षित
संपुष्ट झाले वर्ण भेद
कमी झाले अशिक्षित

नष्ट झाले ते मागासलेपण
बहरले समाज प्रगतीचे क्षण
एकूण सर्वत्र झाला विकास
मार्ग क्रमण झाले झकास

लिंग भेद ही समूळ संपला
अबला नारी, बनली सबला
स्त्री पुरुष आली समानता
सर्व स्तरावर स्त्रीयांची सत्ता

राष्ट्र पातळींवर मिळाले यश
आर्थिक निकषात मात्र अपयश
सर्वत्र अद्याप आर्थिक विषमता
आता पाहीजे आर्थिक समानता

म्हणूनच वाटते नको आरक्षण
आर्थिक समानतेचे हवे संरक्षण
नको आरक्षण नको राजकारण
असावे एकसंघ सुखात सर्वजण

मागासले आता राहीले ना कोणी
राजकारणी लुबाडती ऊगा लोणी
संपवून टाकूया जातीय आरक्षण
घेवून आर्थिक समानतेचे संरक्षण

हिच खरी आंबेडकरांची स्वप्नपूर्तता
संपेल मागासलेपण येईल समानता

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
२७-०७-२०१८.










No comments:

Post a Comment