थंडी वाऱ्यात ही न डगमगता
हिंस्त्र श्वापदांना न घाबरतां
दऱ्या खोऱ्यांत गस्त घालता
शत्रूस त्या सीमेवरच रोखतां
निडर तूम्ही कणखरच बनतां
शत्रूंचा हल्ला परतवून लावता
शत्रूंना सहज नामोहरम करता
मनसुबे तयांचे मोडून काढतां
प्राणपणाने कधी लढतां लढतां
जन संरक्षणार्थ बलिदान देता
हिम्मत न हरतां शहीद होता
भू मातेस तूम्ही सुरक्षित ठेवतां
सजग राहून कार्यरत राहता
शौर्याने सतत विजय मिळविता
अशी सदैव मर्दमुकी गाजविता
अशा आमच्या शूर सैनिकांना
भारतीयांचा सविनय प्रणाम
स्वीकारा आमचा सलाम
सैनिक हो
स्वीकारा आमचा सलाम !
प्रशांत कदम,
9594572555,
18-02-2019.
No comments:
Post a Comment