Wednesday, March 20, 2019

ऋतू !


ऋतू

अरे ऋतूं मध्ये ऋतू
पावसाचा ग चांगला
तहानलेल्या धरेवर
चिंब पाऊस आणला

लाही थांबवूनी कसं
तृप्त केलं ग धरणीला
शाल हिरवी पांघरून
अंगणी बहर आणिला

रिमझिम रिमझिम
संतत पडते अशी धार
शोभतसे नभी कधि
ईन्द्रधनु प्रवेश द्वार

पाऊस पडला पडला
खूष झाला बळीराजा
मातीतून डुले कोंब
निसर्गाची खरी मजा

सरी येती भर भरा
देवाजीची मोठी कृपा
नदी नाले भरतील
सृष्टी सौंदर्य हे जपा

अरे ऋतूं मध्ये ऋतूा
पावसाचा ग चांगला
रिमझिम पावसात
चिंब भिजून घेवू चला

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०५-०७-२०१८.











Sent from my iPhone

आरक्षण !

आरक्षण !!

खूप केला देशाने विकास
स्वातंत्र्योतर सत्तर वर्षांत
देश झाला आपला समृद्ध
संविधानास राहून कटिबद्ध

विरून गेली अस्पृश्यता
समाज झाला शिक्षित
संपुष्ट झाले वर्ण भेद
कमी झाले अशिक्षित

नष्ट झाले ते मागासलेपण
बहरले समाज प्रगतीचे क्षण
एकूण सर्वत्र झाला विकास
मार्ग क्रमण झाले झकास

लिंग भेद ही समूळ संपला
अबला नारी, बनली सबला
स्त्री पुरुष आली समानता
सर्व स्तरावर स्त्रीयांची सत्ता

राष्ट्र पातळींवर मिळाले यश
आर्थिक निकषात मात्र अपयश
सर्वत्र अद्याप आर्थिक विषमता
आता पाहीजे आर्थिक समानता

म्हणूनच वाटते नको आरक्षण
आर्थिक समानतेचे हवे संरक्षण
नको आरक्षण नको राजकारण
असावे एकसंघ सुखात सर्वजण

मागासले आता राहीले ना कोणी
राजकारणी लुबाडती ऊगा लोणी
संपवून टाकूया जातीय आरक्षण
घेवून आर्थिक समानतेचे संरक्षण

हिच खरी आंबेडकरांची स्वप्नपूर्तता
संपेल मागासलेपण येईल समानता

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
२७-०७-२०१८.










अब और हम नही सहेंगे !

ब और हम नही सहेंगे 
 
बस अबऔर हम नही सहेंगे
एक भी जवान और नही खोएंगे
शहीदोंका बलिदान व्यर्थ न जाने देंगे
मौत का बदला लेकर ही रहेंगे

पुंछकारगील मे सबक सिखाया था
फिर भी दुश्मन समझ  पाया था
अपनी हरकतोंसे बाझ न आया था
तब भी हमने माफ किया था

ऊरी में दहशतवाद की हद हुई थी
हमारे जवानों की मौत हुई थी
चोट हिन्दूस्थानीके दिल पर हुई थी
घर घरगली गलीहर शहर हुई थी

अब तो आतंक की हद हो चूकी है
चालीस से जादा जवान शहीद हुये है
हर हिंदुस्थानीके दिल को ठेंस लगी है
बस अब कायर शत्रू की मौत आई है

कश्मिर हमारा है,वैसे भी रहेगा
पर पाकिस्तान तू अब नही बचेगा
हर एक वो दहशतवादी नही रहेगा
जो बुरी नजरसे हिन्दूस्थान को देखेगा

अब  हम खामोश रहेंगे
ना ही फिजुल का जुल्म सहेंगे
युद्ध खामका उन्होने छेडां है
उनको सबक सिखाके रहेंगे

जवानोंके साथ हम सब रहेंगे
जी जान से हम मिलकर लढेंगे
दुश्मन को खत्म करके रहेंगे
सिंध, पाकीस्थान हांसिल करेंगे

मिटा देंगे हम दहशतवाद को
राष्ट्र विरोधी हर एक गद्दार को
कौम की सौगंध हर हिन्दूस्थानी को
खत्म करो अब पाकीस्थान को

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१५-०२-२०१९.










आज सगळे सुख हे लाभले तूझ्या मुळे !!

आज सगळे सुख हे लाभले तूझ्या मुळे,
परिकथे सम सर्व जाहले, तुझ्या मुळे

तुझ्या प्रितीने जीवन हे फुलले,
मोहरले, मन अधीर झाले,
हृदय कसे सहज गुंतले, तूझ्या मुळे,
तूझ्या मुळे, तुझ्या मुळे !

तुझ्या हातांनी घर हे सजले
बहरले, अंगण खुलू लागले,
घरास कसे घरपण आले, तूझ्या मुळे,
तुझ्या मुळे, तूझ्या मुळे !

तुझ्या स्वरांनी शब्द हे गुंफले,
सप्त स्वर झंकारले, गुंजले,
सूरांत कसे सूर मिसळले, तुझ्या मुळे,
तुझ्या मुळे, तुझ्या मुळे !

तुझ्या मैत्रीने दैव ही खुलले
आनंदी मन पुलकीत झाले,
भाग्य कसे अलुवार उजळले, तुझ्या मुळे,
तुझ्या मुळे, तुझ्या मुळे !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०१-०९-२०१८.



,‌प्रितीचे काहूर !!

प्रितीचे काहूर !!

तूझे माझे प्रेम निरंतर
ह्रदयी उठते
प्रितीचे काहूर

सांगना तू प्रियकरा
ह्रदय का हे धडधडे
सोसवेना तूझा विरह
चित्त सदा तूझ्या कडे
गोड अशा त्या संवेदना
सरू नयेत हेच साकडे

तूझे माझे प्रेम निरंतर
ह्रदयी उठते
प्रितीचे काहूर

जिथे जिथे मी पाहते
तुलाच रे मी पाहते
आठवणीत मी अशी
रात्र रात्र जागते
ह्रदय सतत मोहरते
असेच रहावे वाटते

तूझे माझे प्रेम निरंतर
ह्रदयी उठते
प्रितीचे काहूर

राहसी तू का दूरदूर
बंध बांध माझ्या सवे
मागणे हेच माझे
सोबतीस तू रहावे
नको नको अजुन काही
मला तू , तूला मी पहावे

तूझे माझे प्रेम निरंतर
ह्रदयी उठते
प्रितीचे काहूर

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
११-०३-२०१९.




चाल - तेरा मेरा प्यार अमर






आठवणी !

आठवणी !!

आठवणी त्या जागवितां
ह्रदय सहज कसे हेलावले
हो हो
बोलले मनी माझ्या
शब्द शब्द साठलेले
हो हो हो

अव्यक्त प्रेम प्रकटले
हो हो
अश्रु नयनी दाटले
हो हो
विरह असह्य होवूनी
शब्द मनात गोठले
हो हो हो

एकटाच मी आता
हो हो
आठवणींत जागतो
हो हो
जवळ तुलाच पाहतो
तूझ्याच साठी झूरतो
हो हो हो
स्मरून ईश्वरास मी
हो हो
शपथ तूला घालतो
हो हो
हात दे हातात या
हेच फक्त मागतो
हो हो हो

आठवणी त्या जागवितां
ह्रदय सहज कसे हेलावले
हो हो
बोलले मनी माझ्या
शब्द शब्द साठलेले
हो हो हो

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
२७-१२-२०१८.




अबोला !

अबोला !

का ग अबोला धरीला असा तू
चुकले काय कळेना
कसे सांगू कुणाला

कधी एकटा मी असा न जहालो
दूरावलीस का तू
काही सुचेना मनाला

तूझ्या विना जगी या
असून ही मी नाही
मनी वाटते जगावे कशाला

बोलना पुन्हा तू
दिलखुलास हासना
हृदयास वेदना देते कशाला

तूझा हात हाती देना प्रिये तू
विसरून सर्व काही
कर माफ या जीवाला

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०२-०८-२०१८.








Sent from my iPhone

भेट तूझी माझी !


भेट तूझी माझी !

भेट तूझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी
अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी

खळखळून वहात होते, नदीचे ते पाणी
खळखळते हास्य तूझे, तसे भासले राणी
मंद स्मित होते ओठी, मोहकता त्या नयनी

भेट तूझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी
अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी

शांत स्तब्ध होता परिसर, जणू नंदनवना वाणी
तूझ्या माझ्या शिवाय नव्हते, दुसरे तिथे कोणी
दिर्घ श्वास पडत होते, आपले आपल्या कानी

भेट तूझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी
अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी

किलबिलतच होते पक्षी, ती प्रणयाची गोड वाणी
आपले शब्द अडले ओठी, सुरवात करावी कोणी
धडधडत होती हृदये, काळजाच होत होते पाणी

भेट तूझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी
अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी

धुंद वारा होता सुटला, मेघ दाटले होते गगनी
अन अचानक चकाकली ती, विद्युलता गर्जूनी
अन् घाबरून बिलगली होतीस, मला तू राणी

भेट तूझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी
अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१३-०८-२०१८.





Sent from my iPhone

Saturday, March 16, 2019

सलाम सैनिक हो !


थंडी वाऱ्यात ही डगमगता
हिंस्त्र श्वापदांना घाबरतां
दऱ्या खोऱ्यांत गस्त घालता
शत्रूस त्या सीमेवरच रोखतां 
निडर तूम्ही कणखरच बनतां
शत्रूंचा हल्ला परतवून लावता
शत्रूंना सहज नामोहरम करता
मनसुबे तयांचे मोडून काढतां
प्राणपणाने कधी लढतां लढतां 
जन संरक्षणार्थ बलिदान देता
हिम्मत हरतां शहीद होता
भू मातेस तूम्ही सुरक्षित ठेवतां 
सजग राहून कार्यरत राहता
शौर्याने सतत विजय मिळविता
अशी सदैव मर्दमुकी गाजविता
अशा आमच्या शूर सैनिकांना
भारतीयांचा  सविनय प्रणाम 
स्वीकारा आमचा सलाम 
सैनिक हो 
स्वीकारा आमचा सलाम !


प्रशांत कदम,
9594572555,
18-02-2019.








उपाय असफलते वरी !

का घाबरतोस ?
सुरूवात तर कर
चुकशील पडशील
पण हळु हळु जमवशील

असफल झालास तरी
नको होवू निराश
प्रत्येक रात्री नंतर
येतोच दिवसाचा प्रकाश

प्रयत्न रहा करत
अनुभव गाठीशी जमव
एक दिवस सहज
समाजात नाव कमव

 केल्यानेच साद्य होते
आधी केलेच पाहीजे
जाणीव ठेव सतत  ऊरी
हाच उपाय असफलते वरी

प्रशांत कदम,
२१-०२-२०१९,
9594572555.









Friday, March 15, 2019

रहा आनंदी !

रहा आनंदी !!

डोळ्यांत प्रात:काली 
आणू नकोस तू अश्रु,
अंधकार दूर करण्यास
उगवत असतो सुर्य,
हे नकोस तू विसरू !

हो तयार स्वागतास 
झटकून मनातील मरगळ,
कामास लाग परत
कर उल्हसित ते मन,
बघ तेच देईल बळ !

जीवनात क्षण दुखाचे
येतात ते असंख्य,
पण राहतात ते क्षणीक
जर केले सहज प्रयत्ने,
आपण सुखांशी सख्य !

क्षण एक एक सुखाचा
घालवू नकोस तू व्यर्थ,
ठेव ह्रदयात साठवून
मन आनंदी करुनी,
मग जीवनास देईल अर्थ !

आनंद जीवनातला
आनंदी राहण्यातच राहे,
नश्वर अशा जगी ह्या
होईल काय ? केंव्हा ?,
कोणास ज्ञात आहे !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,