गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा
विश्वासघात !!
शांत आता सर्व झाले, शांत तू बसलास कारे
सांग माझ्या बोलण्यावर, काल तू रडलास कारे
काय माझे सांग चुकले, सांगता माझी कहाणी
स्तब्ध झाला तू खरोखर, पूर्णता गढलास कारे
तूच माझा गर्व होता, तूच माझे विश्व होता
पाहता मग मज अचानक, लाजुनी लपलास कारे
छान असता मित्र दोघे, वाढला नाहक दुरावा
कोणत्या रूपास आता, तू पुन्हा भुललास कारे
गुंतलेला जीव असता पुर्ण माझ्यावर तुझा तर
त्याच जीवा वर अचानक तू असा उठलास कारे
प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५,
१८~०८~२०२२.
●