Monday, June 27, 2022

प्रशांत - अभंग -

 




अभंग - भाव भोळा हरी । ( ६।६।६।४ )

भाव भोळा हरी । मनात असावा ।
स्वप्नात दिसावा । नित्य नेमे।

करा सदा भक्ती । पावेल तत्क्षणी ।
दिसे क्षणो क्षणी । आस पास ।

उपास तापास । करावे कशास।
असता जमेस। हरी भक्ती ।

जगावे निर्मळ । नसावी आसक्ती ।
नाही काही सक्ती । देवा ठायी ।

जगाच्या कल्याणी । राबतो अनंत।
खरा साधू संत । ओळखावा ।

करुनी अर्पण । जगी दान धर्म ।
करावे सत्कर्म । सदोदित ।

विठू रखुमाई । आमुची माऊली ।
मिळे ती सावली । चरणांशी।

प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५.



प्रशांत गझल - सूर छेडल्यावर !!



गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा 

सूर छेडल्यावर  !!


खुंटते मग वाढ झाडाची मुळाशी ठेचल्यावर

ताणता तुटतो रबर ही लांब जास्ती खेचल्यावर


सोडवावे वाद सारे ठेवुनीया गर्व मागे

वाद गुंता माफ होतो एकमेका भेटल्यावर 


देव पूजा नित्य करुनी आळवी मी पांडुरंगा

मात्र त्याची जाण होते सोवळे बघ नेसल्यावर


आज प्रचिती माउलीची जीवनाचे मोल कळता 

देव स्वप्नी पाहतो आयुष्य अर्धे वेचल्यावर 


सूर सारे खास कळती दुःख भारी भोगल्यावर

आज ही आनंद मिळतो सूर साधे छेडल्यावर 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - करतोस काय मित्रा !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 


करतोस काय मित्रा !!


होता कठीण सारे रडतोस काय मित्रा

तू घाबरुन जगाला पळतोस काय मित्रा


एकेक श्वास किमती दवडू नकोस वाया

धरुनी मनात भीती बघतोस काय मित्रा


घे तू मशाल हाती शोधात मार्ग सच्चा 

अंधार आत असता जगतोस काय मित्रा 


अस्तास दुःख गेले येतील दिन सुगीचे 

भय दूर सार आता बसतोस काय मित्रा


झोपू नकोस आता दे दाखले जगाला

झोकून सामना कर हसतोस काय मित्रा 


प्रशांत कदम 

मुंबई 

२६~०६~२०२२.

Sunday, June 5, 2022

प्रशांत गझल - पाऊस सांजवेळी !!


 गागालगालगागा, गागालगालगागा - आनंदकंद वृत्त.

पाऊस सांजवेळी !!


पाऊस सांजवेळी, खेटून थांबलेला 

भिजवायला मनाला, येवून थांबलेला ,


पाऊस तर अपरिमित, निसर्ग बहरलेला,

हिरवळ जणू चहुकडे, लेवून थांबलेला


पाऊस मोह माया, प्रीतीस खुलवणारा

मीलन विचार देही, घेवून थांबलेला


पाऊस प्रातःकाली, वारा उधाणलेला

प्रीती अमाप जीवा, देवून थांबलेला


पाऊस सांजवेळी, मोकाट सूटलेला 

वा-यास झेलणारा, भेटून थांबलेला


प्रशांत कदम, 
९५९४५७२५५५,
२०~०८~२०२१.

प्रशांत गझल - गर्दीत माणसांच्या !!


 वृत्त : आनंदकंद  ( तरही गझल )

गागाल गालगागा गागाल गालगागा
गर्दीत माणसांच्या !!

गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही
वाटा नव्या तरी, भरकटलो कधीच नाही

दु:खात माणसांना आधार वाटतो मी
निर्दयपणे तयांवर, हसलो कधीच नाही

आयुष्य खरच होते संग्राम वेदनांचे
कोणी म्हणोत काही, रडलो कधीच नाही

वाटत बरेच होते सर्वच स्वतःस घ्यावे 
नाही कधी मिळाले , रुसलो कधीच नाही

संघर्ष संकटांशी चालू तसाच होता
मोडीत संकटे, घाबरलो कधीच नाही

प्रशांत कदम, 
०४~१०~२०२१.

प्रशांत गझल - घट्ट आहे वीण !!


गालगागा गालगागा गालगागा - मंजुघोषा


घट्ट आहे वीण !!

प्रेम केले लग्न केले पाप नाही
शब्द होता अंतरीचा थाप नाही

प्रीत गहरी भावनांचा मेळ होता
भावना त्या मोजण्याला माप नाही

स्वप्न माझे काल होते आज पूर्ती
श्रेय माझे कोणतीही छाप नाही

लाभली ही साथ प्रेमळ जीवनाची
भाग्य आता खास आहे शाप नाही

घट्ट आहे वीण आता मीलनाची
गाठ कोणी तोडण्याची टाप नाही

प्रशांत कदम 
३०~११~२०२१.
९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - सूर !!


गालगागा गालगागा गालगागा - मंजुघोषा वृत्त 

सूर !!

गात होती कोकिळा बागेत माझ्या
मैफिलीचे सूर ते आहेत माझ्या 

सूर होते खास गुंजन देत पाठी
संग होते आज ते वाटेत माझ्या 

नाद होता ताल होता आज येथे
तो गजर ही छान ह्या छायेत माझ्या

आज तो आनंद झाला ऐकताना
दंग होता मोद ही मायेत माझ्या

सूर करती काय जादू आज कळले
चांगले झंकारले जागेत माझ्या

गात होती कोकिळा बागेत माझ्या
मैफिलीचे सूर ते आहेत माझ्या 

प्रशांत कदम, 
०१~१०~२०२१,

९५९४५७२५५५. 

Saturday, June 4, 2022

प्रशांत गझल - स्वर्ग थोटा भासतो !!



गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा 


स्वर्ग थोटा भासतो !!


गोड नाते राहते का शब्द कडवे बोलल्यावर 

शुद्ध कोणा काय असते घोट कडवे घेतल्यावर


वाइटाला कोण केंव्हा सोडते का आज इतके

नाद जडला तो सुटावा ध्येय उरते लागल्यावर


दूर ठेवावे असे ते मार्ग धोक्याचे सदोदित 

मात्र केवळ दुःख मिळते मित्र सोदे जोडल्यावर 


जाळुनी बघ ह्रदय माझे काय मोठे साधले तू

भोगले तू दुःख ऊगा साथ माझी सोडल्यावर 


देत जावे घेत जावे एकमेका सावरावे

भासतो मग स्वर्ग थोटा माणसे ही भेटल्यावर 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

०२~०६~२०२२.