Saturday, March 28, 2020

.तूझे माझे प्रेम !!

तूझे माझे प्रेम !!                                          
                               

गूलाबाची कळी फुलते
निसर्गाची किमया दिसते
जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

सुख द्यावे दुःख घ्यावे
एकमेकां सहाय्य करावे
हसत खेळत सतत राहूनी
आनंदात मस्त जगावे
घटकाभराच्या आयुष्यात ह्या
नेहमीच समाधान मिळवावे

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

तू नदीची धार भासते
मी जणू तूझा किनारा
तू आहे माझ्या साठी
मी जगतो तूझ्या साठी
तूझ्या डोळ्यांत दिसे सागर
आशेची भरली घागर

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

वादळ तर येते जाते
संकट तसेच कुठे रहाते
क्षणभंगूर ते जीवनी वसते
मोद फिरुनी घेवून येते
कोमेजला चाफा तरीही
सुगंध त्याचा दरवळतो

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

प्रशांत कदम,
9593572555,
12-03-2020.
















1 comment: