Saturday, March 28, 2020

कितीदा नव्याने !!


कितीदा नव्याने !!                                              

कितीदा नव्याने, तूला तेच सांगू
तूझा हात हाती, कसा सांग मागू

तुझ्यावरच प्रेम असे बघ जडले
आयुष्यात जणू आक्रीतच घडले

कळेना थांग पत्ता माझ्या मनाचा
येतच नाही विचार अन्य कुणाचा

प्रतिसाद तूझा मिळवू तरी कसा
विवंचनेत पूरता सापडलो असा

मनोमनी तुझ्यात पुरता अडकलो
तुझ्या होकारा प्रतिक्षेत आसूसलो

कितीदा नव्याने, तूला तेच सांगू
तूझा हात हाती, कसा सांग मागू

@ प्रशांत कदम,
9594572555,
14-02-2020.




——————————————————————————————————————-
English Translation


 How often again !!

 How often will I tell you something new ?
 How do I ask for your hand,
 Look at you as love
 It just happened in life

 I don't understand my heart
 Don't think of anyone else coming
 How do I get your response
 Flooded with full of love

 I always dream for you
 I was waiting for your call
 How often will I tell you something new ?
 how do I ask, for your hand,

 Prashant Kadam,

मी ओळखून आहे !!

मी ओळखून आहे !!                                

मिश्किल बोलणे अन्
बोल खडे सुनावणे
मी ओळखून आहे
प्रिये तूझे हे वागणे

डोळ्यात तुझ्या का
निखार जरा नसावा
उघडताच पापण्या का
राग फुकाचा दिसावा
अनाकलनीय हे समजणे
मनी राग जरा ही नसणे

केले न प्रेम केंव्हा
त्यांना कसे दिसावे
तुझ्यात गुंतलो मी
मला सहज कळावे
तू ओठ दाबूनी हसता
व्हावे मी शहाणे

दिसता छबी तूझी ग
होते प्रसन्न सारे
फुलती कळ्या फुलांच्या
वाहती सुगंधी वारे
येवून प्रेम ऊम्हाळे
स्फुरते सुरेल गाणे

प्रशांत कदम,
9594572555,
17-02-2020.





केंव्हा कसं !!

केंव्हा कस ?                                      

केंव्हा कस,
कळलच नाही
मन हे गुंतले
अन् बघता बघता,
अचानक आपुले
जणू सूर जुळले

आसमंत हा
असा खुललां
फुलांनी पहा
कसा बहरलां
वाडनिश्चय निश्चित
जणू जवळी आला

प्रेमात मी
झालो वेडा
पाहुन प्रिये
तूझ्या ह्या अदा
एकाकी जीणे
जणू न सहवे आता

तूझ्या शिवाय
हवे काय मला
भेटायला असतो
जीव वेडावला
डोळ्यांशी तूझ्या डोळे भिडले
जणू प्रेम जुळले !

प्रशांत कदम,
9594572555,
20-02-2020.








.तूझे माझे प्रेम !!

तूझे माझे प्रेम !!                                          
                               

गूलाबाची कळी फुलते
निसर्गाची किमया दिसते
जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

सुख द्यावे दुःख घ्यावे
एकमेकां सहाय्य करावे
हसत खेळत सतत राहूनी
आनंदात मस्त जगावे
घटकाभराच्या आयुष्यात ह्या
नेहमीच समाधान मिळवावे

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

तू नदीची धार भासते
मी जणू तूझा किनारा
तू आहे माझ्या साठी
मी जगतो तूझ्या साठी
तूझ्या डोळ्यांत दिसे सागर
आशेची भरली घागर

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

वादळ तर येते जाते
संकट तसेच कुठे रहाते
क्षणभंगूर ते जीवनी वसते
मोद फिरुनी घेवून येते
कोमेजला चाफा तरीही
सुगंध त्याचा दरवळतो

जीवन हे असेच असते
जसे तूझे माझे प्रेम खुलते

प्रशांत कदम,
9593572555,
12-03-2020.
















निर्धार !!

निर्धार !!                                                
               
स्पर्शून माझ्या मनाला
केली किमया तू न्यारी
बदलले माझे जीवन
बदलली दुनिया सारी

तूझ्या ईशा-या वरती
तूझ्याच साठी मी गावे
तूझ्या साठी मी गावे
तूझ्या शब्दां वरती
लिहीतच मी रहावे
लिहीतच मी रहावे
गाण्यांतून या माझ्या
जग शोधेल तूज सारे
तूज जग शोधेल सारे

ये माझ्या जवळ अशी तू
प्रेम करू दोघे भरपूर
आनंदी तूला ठेवीन
सुख सारे तूला मी देईन
तूच माझा आहे आधार
तूझ्या साठी जगण्याचा निर्धार

प्रशांत कदम,
9594572555.
13-03-2020.





संकेत !!

संकेत !!                                                          
                                             
केंव्हा तरी मी तूला, होते पाहीले
नेत्र दोघांचे तेंव्हाच, होते गुंतले

आस तर होती पुन्हा भेटण्याची
मनातील सारे तूला सांगण्याची

किती दिवस रात्री होतो मी झुरलो
माझाच मी माझा नव्हतो ग ऊरलो

अचानक तू मला आज बघ दिसलीस
नजरेस नजर मिळवून गोड हसलीस

स्वप्ने जणू माझी सत्य होत आहेत
मिलनाचे मज स॔केत मिळत आहेत

@ प्रशांत कदम,
9594572555,
14-02-2020