Monday, February 3, 2020

वस॔त !!

वसंत !!                                                  

वस॔त ऋतू सूरू जाहला
वाढली पक्षांची किलबिल
फुलांभोवती दिसू लागली
फुल पाखरांची रेलचेल

प्रातःकाली आकाश उघडे
धरती वर दवबिंदूं चे जल
सूर्याचा काही नसे भरोसा
कधि तळपेल कधि लपेल

हरीत पर्णांनी लपून दर्शती
तलाव कसे निर्जल
अचानक त्यात फुलती
लाल कमल पुष्प कोमल

दुःख वेदनांवर निसर्गाने
जणू पांघरूणच घातलं
धरणी वर सुख शांतीचे
छान नव चैतन्य आणलं

वसंतातला बहर पिकांचा
शेतं धरती वर डोलतील
कष्टांचे असे फळ पाहता
बळीराजे आन॔दी होतील

निसर्गाचा असा रम्य नजारा
दिसे वसंत ऋतुत केवळ
म्हणूनच तर बहाल त्यासी
राजस्व सहा ऋतूं मधिल !


@ प्रशांत कदम,
9594572555
02-02-2020.










1 comment: