Sunday, February 9, 2020

तूझ्या हसण्याने !!

तूझ्या हसण्याने !!                                                              

नुसत्याच तूझ्या हसण्याने, जीवनातली दुःखं विसरलो
एकाच तूझ्या हाकेने, निराशेतूनच दूर झालो

ठरविले माझ्या मनाने, उगाच दुःखास होतो बिलगलो
आता पुन्हा नव्याने, जीवनास सामोरा झालो

नुसत्याच तूझ्या हसण्याने, जीवनातली दुःखं विसरलो
एकाच तूझ्या हाकेने, निराशेतूनच दूर झालो

केवळ तूझ्या येण्याने, खरोखरच अवचित मी सावरलो
रोख तूझ्या नजरेने, मनातून रोमांचित झालो

नुसत्याच तूझ्या हसण्याने, जीवनातली दुःखं विसरलो
एकाच तूझ्या हाकेने, निराशेतूनच दूर झालो

पाहिलेस मज प्रेमाने, अन् खदखदून मनात मी हसलो
मंजुळ तूझ्या वाणीने, अती प्रफुल्लित झालो   

नुसत्याच तूझ्या हसण्याने  जीवनातली दुःखं विसरलो
एकाच तूझ्या हाकेने, निराशेतूनच दूर झालो

आधार तूझ्या असण्याने, अलुवार संघर्ष करू लागलो
अन् तूझ्या साथीने, शूर लढवय्या मी झालो

नुसत्याच तूझ्या हसण्याने  जीवनातली दुःखं विसरलो
एकाच तूझ्या हाकेने, निराशेतूनच दूर झालो

प्रशांत कदम,
9594572555,
09-02-2020

कळेना कसा !!

कळेना कसा !!                                                

कळेना कसा हा गुंता सोडवू मी
किती यातना ह्या, बळ आणू कसे मी

जीवनाची ही होडी, गर्तेत बुडाली
दिखावूपणा हा, उगा मिरवला मी
किती यातना ह्या, बळ आणू कसे मी
कळेना कसा हा गुंता सोडवू मी

अशी दशा झाली, दुर्दशे प्रमाणे
नको त्याच चूका, केल्या पुन्हा मी
किती यातना ह्या, बळ आणू कसे मी
कळेना कसा हा गुंता सोडवू मी

पुन्हा जीवनातला, आनंद हा खुंटला
पुन्हा झालो रिता, कसा सावरू मी
किती यातना ह्या, बळ आणू कसे मी
कळेना कसा हा गुंता सोडवू मी

कळेना कसा हा  गुंता सोडवू मी
किती यातना ह्या, बळ आणू कसे मी

प्रशांत कदम,
9594572555.
09-02-2020.






Tuesday, February 4, 2020

मोबाईल सोडून खेळायचे!!

मोबाईल सोडून खेळायचे!!        

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

सोडून मोबाईलशी अति मैत्री
स्वतःची जपावी प्रकृती
जीवनात निरोगी रहायचे
जीवनात निरोगी रहायचे
मोबाईल सोडून  जगायचे

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

रेखाट सुंदर चित्र
कराव॔ं झकास नृत्य
अविष्कार कलेचे करायचे
अविष्कार कलेचे करायचे
मोबाईल सोडून सजायचे

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

बागेत धावत जावे
तराणे आनंदात गावे
झोकाळे घेत गात रहायचे
झोकाळे घेत गात रहायचे
मोबाईल सोडून गुणगुणायचे

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

जोडावी निखळ दोस्ती
खेळच खेळावे जास्ती
खेळांत अग्रेसर बनायचे
खेळांत अग्रेसर बनायचे
मोबाईल सोडून खेळायचे

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

करावा अभ्यास छान
मिळवाव्या पदव्या महान
जगात नाव उज्वल करायचे
जगात नाव उज्वल करायचे
मोबाईल सोडून शिकायचे

दिवस तूझे हे फुलायचे
मोबाईल सोडून खेळायचे

@ प्रशांत कदम,
9594572555,
04-2-2020.





Monday, February 3, 2020

वस॔त !!

वसंत !!                                                  

वस॔त ऋतू सूरू जाहला
वाढली पक्षांची किलबिल
फुलांभोवती दिसू लागली
फुल पाखरांची रेलचेल

प्रातःकाली आकाश उघडे
धरती वर दवबिंदूं चे जल
सूर्याचा काही नसे भरोसा
कधि तळपेल कधि लपेल

हरीत पर्णांनी लपून दर्शती
तलाव कसे निर्जल
अचानक त्यात फुलती
लाल कमल पुष्प कोमल

दुःख वेदनांवर निसर्गाने
जणू पांघरूणच घातलं
धरणी वर सुख शांतीचे
छान नव चैतन्य आणलं

वसंतातला बहर पिकांचा
शेतं धरती वर डोलतील
कष्टांचे असे फळ पाहता
बळीराजे आन॔दी होतील

निसर्गाचा असा रम्य नजारा
दिसे वसंत ऋतुत केवळ
म्हणूनच तर बहाल त्यासी
राजस्व सहा ऋतूं मधिल !


@ प्रशांत कदम,
9594572555
02-02-2020.










Saturday, February 1, 2020

आया आया वसंत आया !

आया आया वसंत आया !                                    

आया आया वसंत आया
ऋतूओं का राजा खिल कर आया
मौसम सुहाना बनाकर छाया
जाङों की बौछारे धुंधली कर लाया
आया आया वसंत आया !

सरसों की पिली बहार ले आया
पत्तों पत्तोंपर नयी उमंग ले आया
रंग बिरंगी फुलोंकी पुहार ले छाया
पक्षीओं की कलकल झंकार भी लाया
आया आया वसंत आया !

सुरज की सुहानी किरणे ले आया
तालाबो में कमल खिला कर आया
कमल पत्तों से पानी को छिपाकर छाया
मानो दूख दर्द मिटाकर सूख को लाया
आया आया वसंत आया !

आसमानमें तरोताजा हवा ले आया
तितलीयोंको फुलोंसे मिलाते आया
किसानोंके दिलोंमे खुशी भर कर छाया
कवीयों के मनमे नयी कल्पनायें लाया
आया आया वसंत आया !

प्रशांत कदम,
9594572555,
01-02-2020.