Monday, June 27, 2022

प्रशांत - अभंग -

 




अभंग - भाव भोळा हरी । ( ६।६।६।४ )

भाव भोळा हरी । मनात असावा ।
स्वप्नात दिसावा । नित्य नेमे।

करा सदा भक्ती । पावेल तत्क्षणी ।
दिसे क्षणो क्षणी । आस पास ।

उपास तापास । करावे कशास।
असता जमेस। हरी भक्ती ।

जगावे निर्मळ । नसावी आसक्ती ।
नाही काही सक्ती । देवा ठायी ।

जगाच्या कल्याणी । राबतो अनंत।
खरा साधू संत । ओळखावा ।

करुनी अर्पण । जगी दान धर्म ।
करावे सत्कर्म । सदोदित ।

विठू रखुमाई । आमुची माऊली ।
मिळे ती सावली । चरणांशी।

प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५.



प्रशांत गझल - सूर छेडल्यावर !!



गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा 

सूर छेडल्यावर  !!


खुंटते मग वाढ झाडाची मुळाशी ठेचल्यावर

ताणता तुटतो रबर ही लांब जास्ती खेचल्यावर


सोडवावे वाद सारे ठेवुनीया गर्व मागे

वाद गुंता माफ होतो एकमेका भेटल्यावर 


देव पूजा नित्य करुनी आळवी मी पांडुरंगा

मात्र त्याची जाण होते सोवळे बघ नेसल्यावर


आज प्रचिती माउलीची जीवनाचे मोल कळता 

देव स्वप्नी पाहतो आयुष्य अर्धे वेचल्यावर 


सूर सारे खास कळती दुःख भारी भोगल्यावर

आज ही आनंद मिळतो सूर साधे छेडल्यावर 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - करतोस काय मित्रा !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 


करतोस काय मित्रा !!


होता कठीण सारे रडतोस काय मित्रा

तू घाबरुन जगाला पळतोस काय मित्रा


एकेक श्वास किमती दवडू नकोस वाया

धरुनी मनात भीती बघतोस काय मित्रा


घे तू मशाल हाती शोधात मार्ग सच्चा 

अंधार आत असता जगतोस काय मित्रा 


अस्तास दुःख गेले येतील दिन सुगीचे 

भय दूर सार आता बसतोस काय मित्रा


झोपू नकोस आता दे दाखले जगाला

झोकून सामना कर हसतोस काय मित्रा 


प्रशांत कदम 

मुंबई 

२६~०६~२०२२.

Sunday, June 5, 2022

प्रशांत गझल - पाऊस सांजवेळी !!


 गागालगालगागा, गागालगालगागा - आनंदकंद वृत्त.

पाऊस सांजवेळी !!


पाऊस सांजवेळी, खेटून थांबलेला 

भिजवायला मनाला, येवून थांबलेला ,


पाऊस तर अपरिमित, निसर्ग बहरलेला,

हिरवळ जणू चहुकडे, लेवून थांबलेला


पाऊस मोह माया, प्रीतीस खुलवणारा

मीलन विचार देही, घेवून थांबलेला


पाऊस प्रातःकाली, वारा उधाणलेला

प्रीती अमाप जीवा, देवून थांबलेला


पाऊस सांजवेळी, मोकाट सूटलेला 

वा-यास झेलणारा, भेटून थांबलेला


प्रशांत कदम, 
९५९४५७२५५५,
२०~०८~२०२१.

प्रशांत गझल - गर्दीत माणसांच्या !!


 वृत्त : आनंदकंद  ( तरही गझल )

गागाल गालगागा गागाल गालगागा
गर्दीत माणसांच्या !!

गर्दीत माणसांच्या चुकलो कधीच नाही
वाटा नव्या तरी, भरकटलो कधीच नाही

दु:खात माणसांना आधार वाटतो मी
निर्दयपणे तयांवर, हसलो कधीच नाही

आयुष्य खरच होते संग्राम वेदनांचे
कोणी म्हणोत काही, रडलो कधीच नाही

वाटत बरेच होते सर्वच स्वतःस घ्यावे 
नाही कधी मिळाले , रुसलो कधीच नाही

संघर्ष संकटांशी चालू तसाच होता
मोडीत संकटे, घाबरलो कधीच नाही

प्रशांत कदम, 
०४~१०~२०२१.

प्रशांत गझल - घट्ट आहे वीण !!


गालगागा गालगागा गालगागा - मंजुघोषा


घट्ट आहे वीण !!

प्रेम केले लग्न केले पाप नाही
शब्द होता अंतरीचा थाप नाही

प्रीत गहरी भावनांचा मेळ होता
भावना त्या मोजण्याला माप नाही

स्वप्न माझे काल होते आज पूर्ती
श्रेय माझे कोणतीही छाप नाही

लाभली ही साथ प्रेमळ जीवनाची
भाग्य आता खास आहे शाप नाही

घट्ट आहे वीण आता मीलनाची
गाठ कोणी तोडण्याची टाप नाही

प्रशांत कदम 
३०~११~२०२१.
९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - सूर !!


गालगागा गालगागा गालगागा - मंजुघोषा वृत्त 

सूर !!

गात होती कोकिळा बागेत माझ्या
मैफिलीचे सूर ते आहेत माझ्या 

सूर होते खास गुंजन देत पाठी
संग होते आज ते वाटेत माझ्या 

नाद होता ताल होता आज येथे
तो गजर ही छान ह्या छायेत माझ्या

आज तो आनंद झाला ऐकताना
दंग होता मोद ही मायेत माझ्या

सूर करती काय जादू आज कळले
चांगले झंकारले जागेत माझ्या

गात होती कोकिळा बागेत माझ्या
मैफिलीचे सूर ते आहेत माझ्या 

प्रशांत कदम, 
०१~१०~२०२१,

९५९४५७२५५५. 

Saturday, June 4, 2022

प्रशांत गझल - स्वर्ग थोटा भासतो !!



गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा 


स्वर्ग थोटा भासतो !!


गोड नाते राहते का शब्द कडवे बोलल्यावर 

शुद्ध कोणा काय असते घोट कडवे घेतल्यावर


वाइटाला कोण केंव्हा सोडते का आज इतके

नाद जडला तो सुटावा ध्येय उरते लागल्यावर


दूर ठेवावे असे ते मार्ग धोक्याचे सदोदित 

मात्र केवळ दुःख मिळते मित्र सोदे जोडल्यावर 


जाळुनी बघ ह्रदय माझे काय मोठे साधले तू

भोगले तू दुःख ऊगा साथ माझी सोडल्यावर 


देत जावे घेत जावे एकमेका सावरावे

भासतो मग स्वर्ग थोटा माणसे ही भेटल्यावर 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

०२~०६~२०२२.


Sunday, May 29, 2022

प्रशांत गझल - मी ही तयार आहे !!



आनंदकंद वृत्त - गागाल गालगागा गागाल गालगागा

मी ही तयार आहे !!


धंदे बरेच केले, बसलो कधीच नाही

व्यापार खूप केला, चुकलो कधीच नाही


अनुभव चिकार आले, तावून मी निघालो

धक्केच घेत शिकलो, थकलो कधीच नाही


मदतीस येत होतो, कोणास ही कधीही

नाही कधी न म्हटले, दमलो कधीच नाही


शेतात काम केले, धरणीस मानले, नी

मातीत रंगलो मी, हरलो कधीच नाही


देशास पाहिजे ते, सैनिक तरूण उमदे

मी ही तयार होतो, हटलो कधीच नाही


प्रशांत कदम 

०५~१०~२०२१.

९५९४५७२५५५.

Saturday, May 28, 2022

प्रशांत गझल - हुंडा !!




 गालगागा गालगागा गालगागा - वृत्त - मंजुघोषा


हुंडा !!


गोड माझे शब्द होते का न कळले 

सांग पाहू पाय पाठी का न वळले 


पेटले जर रान सारे वाढलेले 

झाड काटेरी तरी मग का न जळले 


निरपराधी जंगलावर पण निखारे

दुःख सारे बघ वनाचे का न टळले


भ्रूणहत्या का मुलींची लोक करती

चित्त त्यांचे मारताना का न ढळले


होत आहे  छळ वधूचा घेत हुंडा 

जावयाला बांधवांनी का न छळले 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५.

प्रशांत गझल - अक्रित



 8/8/6 - शुभगंगा 

अक्रित 

आज चांदणे ढगात लपले तुझ्या मुळे

शोधत प्रीती उनात हसले तुझ्या मुळे


तुला पाहता गोळा झाले नभात तारे 

अंबर सारे उत्तम सजले तुझ्या मुळे


मत्सरात त्या नाहक रुसल्या अप्सरा जणू 

नयन तयांचे नकळत भरले तुझ्या मुळे 


प्रफुल्लित कसे जग पण झाले पाहता तुला

कित्येकांचे जीवन रमले तुझ्या मुळे


सौंदर्यवती जरी साजणी साधी माझी

जीवनात ह्या अक्रित घडले तुझ्या मुळे


प्रशांत कदम, 

मुंबई, 

१४~०५~२०२२.

प्रशांत गझल - गीत गावे !!



गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 

गीत गावे !!


संगीत ही पुजावे, शब्दांसमेत जावे

आस्वाद अन सुरांचे, माधुर्य घेत जावे


सुमधूर त्या सुरांना, आलाप जर मिळाला

तल्लीन होत सर्वां, आनंद देत जावे


नाही हुषार कोणी, शिकतील गात सारे

पुन्हा प्रयत्न करुनी, शिकवीत तेच जावे


मिळवून यश बरोबर, प्राविण्य संपदावे

संगीत तेच भारी, ऊंचीस नेत जावे


पद्यात बोलतांना, गाण्यात गात जावे

संगीत मैफिलीला, सूरांसवेत जावे


प्रशांत कदम, 

१२~१२~२०२१.

९५९४५७२५५५. 


Thursday, May 12, 2022

प्रशांत गझल - आनंदी जगलो मी !!



 वृत्त - जीवनलहरी -  मात्रा -  ६/६


आनंदी जगलो मी !!


आनंदी, जगलो मी

त्याच मुळे, तगलो मी


दु:ख दिले, नच कोणा

ना कोणा,  हसलो मी


विवादही , केले मी

ना कोठे, फसलो मी


कामाला, ना हसता

कामाशी, गढलो मी


खडतर ते, दैव सदा 

निवांत ना, बसलो मी


प्रशांत कदम,

मुंबई.

०७~०५~२०२२

Tuesday, May 10, 2022

प्रशांत गझल - थांबू नकोस आता !!

 


वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


थांबू नकोस आता !!


पाहू नकोस मागे, मोडू नकोस आता

निश्चित करून ध्येये, सोडू नकोस आता


आता पुढेच जा तू , विसरून मोह माया

दगडा वरील रेषा, खोडू नकोस आता


दुष्टांस सोड पाठी, हाणून पाड त्यांना

हेवे तसेच दावे, जोडू नकोस आता


नाती नवीन सच्ची, जोडून काम घे तू

संगत गुरूजनांची, तोडू नकोस आता 


घे साथ सज्जनांची, काचे समान हो तू

वचनास जाग थोडे, फोडू नकोस आता 


प्रशांत कदम, 

९५९४५७२५५५,

१३~०१~२०२१.

प्रशांत गझल - भारत !!



 वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


भारत !!

झेंडे खरेच येथे गगनात भारताचे

सुफलाम नाव मोठे जगतात भारताचे


हाती असे तिरंगा प्रत्येक माणसाचे 

सुजलाम काम आहे विश्वात भारताचे


ही मातृभूमि आहे प्राणाहुनी जवळची

सारेच नाव घेती मानात भारताचे


प्रशांत कदम

मुंबई, 

९५९३५७२५५५,

२६~०१~२०२२.

प्रशांत गझल - राम राज्य सरले !!



 दु:ख आता फार झाले,  तरही गझल  ( नाव माहीत नाही ) 

वृत्त : मनोरमा  - लगावली : गालगागा गालगागा


राम राज्य आज सरले !! ()


बंद आता दार झाले

(दुःख आता फार झाले)


काय सांगू आज साध्या 

माणसांवर वार झाले


चूक ज्यांची मात्र नाही

तेच नाहक ठार झाले


आहुती ही आज घेता

राग अवघे गार झाले 


राम राज्य आज सरले

हे कथेचे सार झाले


प्रशांत कदम, 

मुंबई, 

९५९४५७२५५५,

२६~०१~२०२२.

प्रशांत गझल - जगा वेगळे मागणे ( )

 


जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

जरा वेगळे बोलणे मांडतो मी
(जगा वेगळे मागणे मागतो मी)

अधाशी पुढारी नको सांगतो मी
जगा सर्व वाटा असे सांगतो मी

अघोरी नको रे पुजारी कधीही
जना देत दानी रहा बोलतो मी

भयंकर नको रे शिकारी कधीही
दयावंत होता तया मानतो मी

कलंदर नको रे न ढोंगी कधीही
जगी सर्व सुंदर असे पाहतो मी

प्रशांत कदम,
मुंबई
२७~०१~२०२२,
९५९४५७२५५५


प्रशांत गझल - अर्थ जगण्याचा !!

 


गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त 

अर्थ जगण्याचा !!


भांडण उगाच करुनी, हसण्यात अर्थ नाही

त्रागा उगाच करुनी, जगण्यात अर्थ नाही


आयुष्य छान आहे, आनंद रोज घ्यावा

दिवसा गणीक तंटे, करण्यात अर्थ नाही


ध्येये समोर घ्यावी, श्रम ही तसे करावे

कामास देव माना, हरण्यात अर्थ नाही 


येईल ते स्विकारा, अल्पात हर्ष माना

निष्क्रीय होत केवळ, बसण्यात अर्थ नाही


संतुष्ट हेच मोठे, औषध जगावयाचे

कार्यात मग्न व्हावे, रुसण्यात अर्थ नाही.


प्रशांत कदम, 

९५९४५७२५५५,

२८~०१~२०२२.

प्रशांत गझल - सांज !!



 गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद 

सांज !!

केंव्हा तरी मनाला, फुलवून सांज गेली

दिपले अजून डोळे, हरखून सांज गेली 


कळले मलाच तेंव्हा, आभाळ खास होते

थ॔डी तशी गुलाबी, भरवून सांज गेली


बोलू कसे कुणाला, हातात हात होते

ऊरात स्पंदनाना, फसवून सांज गेली


आकाशही बुडाले, अंधार दाट झाला

धूसर वसुंधरा ती, हरवून सांज गेली


कळले मला न तेंव्हा, फसलो मिठीत केंव्हा

मग ओढ शेवटाची, सजवून सांज गेली


प्रशांत कदम, 

मुंबई 

९५९४५७२५५५,

२८~०२~२०२२.

प्रशांत गझल - का असे !!

 


वृत्त - प्रेय
गाललगा गालगा गाललगा गालगा


का असे ?

आज मला सांग ना, भासवते का असे ?
राग मनी नसुन ही, दाखवते का असे ?

प्रेम तुझे आहे ते, दाखवना आज ते
बाज तुझा पाहता, जागवते का असे ?

पाठ मला कारणे, आहेत बघ कालची
राग फुका आणुनी, नाचवते का असे ?

तूच अता बोलना, घेत मला समजुनी
दु:ख पुरे, सोडना, साठवते का असे ?

लोभ कधी धरु नको, दान स्वता करत जा
मानवता का हवी ? जाणवते का असे ?

प्रशांत कदम,
मुंबई,
०१~०२~२०२२,
९५९४५७२५५५.