Saturday, June 1, 2019

बाबा !!

बाबा 

दु:ख सागरात सोडून सर्वां 
बाबा आमचे गेले
अकस्मात इहलोक त्यागूनी
कैलासवासी झाले

आवडते ते होते सर्वांचे 
देवास ही आवडले
क्षणात आम्हा पोरके करूनी 
दैवाने तयांस नेले 

सतत बोलत हसतां हसतां
पडद्या आड दडले
नातवंडांशी लपंडाव खेळता
कायमचे लपले

लाघवी स्वभाव आपुलकी भावना
घेऊनच ते जगले
आप्तेष्ट मित्र परीवारातच
ते आनंदाने रमले

मार्गदर्शन त्यांचे आम्हास सदैव
पदो पदी लाभले
आशिर्वाद ही भर भरून त्यांचे
सर्वांनी मिळविले

आठवणी मागे ठेऊनी आता
अंतरी ते लोपले
हसत खेळत जीवन जगण्या
तरी आम्हा शिकविले

हसत खेळत जीवन जगण्या
त्यांनी आम्हा शिकविले !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२८ - ०१ - २०१७.








Sent from my iPhone

जिथे पिकत, तिथे विकलं नाही जात !

पिकते, तिथे नाही जात विकले 

जिथे पिकत, तिथे  विकलं नाही जात
मुल्यवान असलं जरी, कुणी नाही पहात

पिकवणारा करत असतो, खूप खूप मेहनत
पण कदर त्याची कुणी, कधी नाही करत

जीद्दीने करत असतो, तो सातत्याने हिम्मत
कळत नाही कुणाला, या गुणांची किंमत

असतो तो वेडा निर्माता, कलेचा फार चाहता
आपलेच उगाच हसतात, त्याला फक्त पाहता

उपहास, उपरोधिक ताशेऱ्यांची होते मग सवय
फरक नाही पडत त्याला, तो होतो निर्भय 

ना उमेद होतं नाही तो मात्र कुठे, कधीच
जाणीव असते त्याला, आपल्या यशाची नेहमीच

आपल्या परिवारात मिळत नसली जरी, किंमत
बाहेरील जगतात त्याला असते, रोल माॅडेलची पत

इतिहास आहे साक्षी, आहेत अनेक दाखले
खरच जिथे पिकते, तिथे नाही जात विकले

प्रशांत कदम ,
९५९४५७२५५५.
३०-१०-२०१६














Sent from my iPhone

केंव्हा कधि कसा ? प्रेमात मी पडलो !

केंव्हा कधि कसा ? प्रेमात मी पडलो
कळलेच नाही कसा, असा मी भरकटलो

माझाच न राहता परका बनून मी राहीलो 
वेगळ्याच त्या नशेत, अपसुक मी रमलो

सुंदर लाघवी स्वप्ने पहात मी बसलो
स्वप्नांतील दुनियेत, उगाच मी बहकलो

प्रेमचित्र ते एक तर्फी रेखाटत मी बसलो
प्रतिसादाची फक्त वाट, पहात मी फसलो

कळले सत्य जेंव्हा उदासीन मी झालो
जिवंतपणी देखील, मेल्याहून मी मेलो 


प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२३-१०-२०१६.










Sent from my iPhone

आपली दिपावली, शुभ दिपावली !

आली दिवाळी, आली दिवाळी, 
आपली दिपावली, शुभ दिपावली

आली दिवाळी, पहाट वेळी
आनंदाने अभ्यंग स्नान करू
दिव्या दिव्यांचे पुजन करूनी
अंगणी, दिव्यांची आरास करू

आल्हाददायक रम्य प्रहरी
ऊंच आकाश कंदील लावू
गार हवेच्या झुळुकां मधुनी
भुरभुरणाऱ्या शेपट्या धरू

सुगंधित फुलांची करू बांधणी
दारां वरती तोंरणे लावू
स्वच्छ अंगणी काढू रांगोळी
विविध छटांचे रंग भरू

नवे नवे पोशाख चढवूनी
दिवाळी साजरी चला करू
फुलबाजा अन् भुई नळ्यांनी
फटाक्याची आतषबाजी करू

मंगल समयी करून आरती
देवांचें आपल्या पुजन करू
सुवासिक, सुगंधित अगरबत्तींनी
वातावरण ही उल्हसित करू

लाडू, चिवडा, करंजी, चकल्या
शेव, अनारसे अन् शंकरपाळ्या
गोड, तिखटाचे पदार्थ मांडून
सुमधुर, रुचकर फराळ करू

गाय वासराची पुजा करू
धन्वंतरीचे ही आशिर्वाद घेऊ
असत्यावर विजय मिळवू
लक्ष्मीला खरेच प्रसन्न करू

पाडव्याला आणू नवा गोडवा
बहीणभावाची माया दृढ करू
आनंदा बरोबर भरभराटी साठी
दिपावली, एकत्र साजरी करू 

आली दिवाळी, आली दिवाळी, 
आपली दिपावली, शुभ दिपावली 

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
२६-१०-२०१६.












Sent from my iPhone

नको एल् ई डी !




नको एल् ई डी, 
नकोत लॅंटर्न,
नकोच चायनीज दिवाळीला

लावू कंदील,
पेटवू पणत्यांच 
ऊत्तेजन देऊ स्वदेशीला 

देऊ दणका,
परत पाठवू
प्रत्येक चायनीज फटाक्याला 

बांडगूळ जिवाचा,
साप अस्तिनचा 
अद्दल घडवू या शत्रूच्या मित्राला 

करू साजरी,
वापरून स्वदेशी
दिवाळीचा अभिमान भारतीयाला

दिव्या दिव्यांची,
ज्योत पेटवू
सहाय्य करू आपल्या आर्मीला

आनंद उत्साह,
करू साजरा
जवानांसह ह्या दिपावलीला 

देशाचे धन,
देशातच ठेवू
शपथ घेवू लक्ष्मी पुजनाला 

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२३-१०-२०१६.






Sent from my iPhone

स्वत:स एव्हढे, नको संभाळू !

स्वत:स एव्हढे, नको संभाळू
पाऊस येतां, भिजुन पहा तू

चंद्र घेवुनी, कुणी न येईल
चेहऱ्यानीच अग, चमक जरा तू

हिरे अन् मोती, वेदनाच देती
कशास आसवे, नयनी नेशी तू

सुंदर ओठांनी, काय करावे 
बोल बोलतां, हसत रहा तू

ऊन्हे परतली, वाट पाहूनी
धावूनी छतावर, येना जरा तू

नाही सांगत, प्रेम करायला
हरकत काय, मित्र समज तू

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
२८-०९-२०१६

ग़झल: बशीर बद्र

खुद को इतना भी मत बचाया कर,
बारिशें हो तो भीग जाया कर।

चाँद लाकर कोई नहीं देगा,
अपने चेहरे से जगमगाया कर।

दर्द हीरा है, दर्द मोती है,
दर्द आँखों से मत बहाया कर।

काम ले कुछ हसीन होंठो से,
बातों-बातों में मुस्कुराया कर।

धूप मायूस लौट जाती है,
छत पे किसी बहाने आया कर।

कौन कहता है दिल मिलाने को,

बशीर बद्र यांचे एका हिंन्दी गजलेवर आधारीत !


पाऊस असतां, का लाजत अशी उभी तू ?
चिंब-चिंब भिजुनी, कधि मोहविणार तू ?

चंद्र कशाला, यावा आकाशी अनाहूत तो 
झग मग-झग मग, मुखडाच उजळवेल तो

हिरे मोती कशाला, दु:खच देत असतां ते
झर झर आसवं, नको गाळू डोळ्यांतून ते

ओठ डाळींबी, जणू कोमल कमल कळी ते
बोलत बोलत, कर वापर, हसत राहतील ते

ऊन्हे परतती, सुकून वाट पाहून दररोज ती
धावत धावत, ये छतावर बहाणे करून ती

नाही सांगत, प्रेम प्रपंच ही नको करूस तू
कमीत कमी, मित्र तरी बनवशील मला तू ?

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
११-१०-२०१६.



पाऊस असतां, का लाजत एकटीच तू उभी
चिंब चिंब जलधारांनी भिजव आपली छबी

चंद्र कशास हवा, अनाहुत भासे तो आकाशी
चम चमता असतां, हसरा मुखडा तुज पाशी

हिरे मोती, मूल्यवान जरी दु:ख सदा दावीती
टप टप आसवं लोचनांत मोत्या सम भासती

ओठ डाळींबी कमल कळी, वापर कर तयांचा
बोलत बोलत हसत रहा, दर्शव गाल खळीचा

ऊन्हे परतती, वाट पाहती, दररोज ती बापडी
धावत धावत, ये आगाशीत कर बहाणे थोडी

नकोच पडू प्रेमात, नाही कुठली ही अपेक्षा
हातात हात मैत्रीचा, द्यावास ही मात्र आशा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१३-१०-२०१६.


बशीर बद्र यांचे एका हिंन्दी गजलेवर आधारीत !


Sent from my iPhone

विरह !!

विरह 

काहीच कसे मला जमेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
प्रयत्न पण, किती मी केले
आठवण सरावी म्हणून वाचन केले
पुस्तकात ही,मन रमेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना

बागेत ही जावून बसलो
निसर्गाच्या, छायेत राहीलो
परिणाम पण, उलटा झाला
आठवणींच्या हिंदोळ्यांनी फेर धरला
हिरवळीत ही, मन खुलेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना

मंद संगित ऐकत बसलो
सूर, स्वरांत धून ही गायलो
नाद सुरांनी पण, घात केला
तुझ्याच स्वरांचा ठेका पकडला
संगीतात ही, मन रिझेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना

मन:शांतीस राऊळात गेलो
ईश्वर चरणी लीन झालो
नाद ब्रम्ह पण, स्वैर विखूरला
तुझीच रूपे भासवू लागला
राऊळात ही, शांती मिळेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना

लोचने माझी अधीर झाली 
तुझ्या दर्शना झुरू लागली
आता परतून पण, ये माघारी
शपथ, सोडली दुनियादारी
तुझ्या विना, काही कळेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना.

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०९-१०-२०१६.















Sent from my iPhone

सांग सोडू कसा !

सांग सोडू कसा ?

हात गळ्यातील तूझा, आनंद देई मना
गंध श्वासातला, सांग मी सावरू कसा ?

मंद हास्य तुझे, फुलविते स्वप्न माझे
रोख हास्याचा, सांग मी समजू कसा ?

बोलके डोळे तुझे, दाखविती रंग नवे
नजरेचे बाण हे, सांग मी थोपवू कसा ?

मंजुळ स्वर तुझे, मोहविती जग माझे
स्वरांची मैफल, सांग मी आवरू कसा ?

मोहक रूप तुझे, घायाळ करते मला
यौवनाचे तेज हे, सांग मी रोखू कसा ?

घट्ट मिठी तुझी, सर्वस्वच देतसे मला 
स्पर्श जिव्हाळ्याचा, सांग सोडू कसा ?

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०५-१०-२०१६.







Sent from my iPhone
Show quoted text

मंगलमूर्ति मोरया !!


मंगलमूर्ति मोरया

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!

तुम्हीच आमचे रक्षणकर्ता
तूम्हास आम्ही विनवीतो आता
सकलजनांची पीडा वेदना
दूर करावी हीच प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!

तुम्हीच आमचे पालनकर्ता
चरणी तुमचे ठेवीतो माथा
दुःख आमचे दूर करा हो
सुख समृद्धी घेउन या हो

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!

तुम्हीच आमचे भाग्य विधाता
मंगलमूर्ति तुम्ही विद्या दाता
ज्ञान देऊनी साक्षर करता 
सरस्वतीचा आशिर्वाद द्या हो

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!

तुम्हीच आमचे तारणकर्ता
आमचे रक्षण तूम्हीच करता
वंदन करूनी तूम्हा पुजितो 
आस कृपेची आम्ही ठेवीतो 

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१८-०८-२०१६.








Sent from my iPhone

केसांची केस !


केसांची केस !

अचानक केस हातात आली
केसांच्या सुंदरते साठी असेल
किंवा सुंदर दिसण्या साठी असेल
पण हल्ली मध्यम वयाच्या तरूणी
पार्लर मध्ये आठ आठ तास बसून
केसांचे स्ट्रेटनींग करून घेतात,
आपल्या मोहक कुरळया केसांवर
तासंतास नाहक अत्याचार करून 
विविध केमिकल्स् चे लेप चढवून
गरम गरम ईस्त्रीच फिरवून घेतात,
का ? तर केस सरळ व्हावेत म्हणे
बरे आठ तास पार्लरवालीला अन् 
पुढील आठ दिवस नवऱ्याला त्रास,
बायकोच्या केसांच्या दिमतीसाठी
नवरा बायकोचे केस सांभाळतोय
तिच्या झोपेत ते वाकडे  व्हावेत
यासाठी स्वताची झोप बाजूस ठेऊन
(हुहुचीपुपुहुजुर हुकमाची पूर्ण पुर्तता
करीत आपले पती कर्तव्य बजावतोय
काय करणार घामाचे पैसे ओतलेत ना,
पण ह्या तरूणीना एवढ कळत नाही
केस म्हणजे कुत्र्याच शेपुटच जणू
किती ही प्रयत्न केलेत तरी पुन्हा 
ते वाकडेच किंवा कुरळेच होणारच,
केसांचे मुळचे सौंदर्य घालवून
कमकुवत होऊन पांढरे होण्याचे
प्रमाण मात्र नाहक वाढवणार,
आता सांगा यांत फायदा कोणाचा ?
स्ट्रेटनींग योग्य आहेकी थ्रेटनींग आहे ?
निर्णय तुमचा अन् केस ही तूमचेच 
केस हातात आली अन् सहजच सुचलं 
म्हणून सर्वांसमोर निर्णयार्थ मांडलं !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१६-०८-२०१६.









Sent from my iPhone

मैत्री !


मैत्री

खुलता कळी खुलेना
का ? ते मला कळेना
किती वेळा असे झाले
स्वताला मीच समजावले

तिच्या अपेक्षा खूप होत्या
 पटण्या सारख्याही नव्हत्या
प्रयत्नात काही नव्हते कमी
तरीही ठरत होतो कुचकामी

परिस्थिती प्रतिकूल होती
यशाची साथ मिळत नव्हती
तिच्या समोर फिका ठरलो
नजर भिडवू नाही शकलो

माझी मलाच खंत वाटली
पण हार मात्र नाही मानली
पुन्हा मैत्री मिळवण्या साठी
मी माझी कंबर कसली

येईल एक दिवस माझा
उतरेन मी परिक्षेत खरा
संपून जातील सर्व अवगुणं
परिस्थिती ही होईल अनुकुल

समोरूनच पुढे येईल हात
मैत्रीची असेल तिच खरी साथ
घेउन मग हातात हात
आयुष्याची होईल सुगम्य सुरूवात !!

प्रशांत कदम ,
९५९४५७२५५५.
०८-०८-२०१६.





Sent from my iPhone

शपथ देशा साठी !!


शपथ देशा साठी,

स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ
देशातले धन देशातच ठेऊ,
स्वदेशी जोपासायला
स्वातंत्र्याचा लढा दिला,
विदेशींना पीटाळूंन लावले
आणि राष्ट्र स्वतंत्र झाले,
स्वातंत्र्य मिळवल्यावर मात्र
स्वदेशीचे महत्व ओसरले,
विसरून गेलो स्वदेशी मंत्र
ज्ञान विज्ञानाचे आपले तंत्र,
विदेशांनी पुन्हा साधला डाव
अर्थ व्यवस्थेवरच घातला घाव,
विदेशी वस्तूंची लावली सवय
तरूणानाही आता तेच हवय
विदेशी गॅजेटनी वेड लावलय
चलनाचही स्त्रोत बिघडवलय,
आता मात्र पुन्हा जागे होऊ
स्वदेशी वस्तूंनाच उत्तेजन देऊ,
अर्थ व्यवस्था करू भक्कम
देशात आणू परकीय रक्कम,
म्हणून पुन्हा सर्व एकत्र येऊ
स्वदेशी वस्तूच खरेदी करू
भारतमातेला सशक्त करू ,
स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ
देशातले धन देशातच ठेऊ !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१४-०८-२०१६.



Sent from my iPhone