वृत्त - आनंदकंद
लगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा
लागू नकोस पाठी !!
लागू नकोस पाठी, होणार खास आहे
नशिबात जे लिहीले, घडणार खास आहे
लपवू नकोस काही, खोटा नको खुलासा,
लपवल जरी कितीही, दिसणार खास आहे
आधीच व्यर्थ आता, सांगायचे कुणाला ?
होते जरी चुकीचे, कळणार खास आहे
हव्यास फार मोठा, आता हवा कशाला ?
दैवात आज जे जे, मिळणार खास आहे
सच्चेपणास आता, पर्याय ठोस नाही
खोटेपणा चुकीचा, नडणार खास आहे
प्रशांत कदम,
गोरेगांव,
मुंबई.
९५९४५७२५५५.