वृत्त - आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
लाटा !!
येती अनेक लाटा दिसतात त्या कलंदर
खेळू नका परंतू असतात त्या भयंकर
येतात वादळे ही जातात ती उडूनी
लाटाच उत्तर देती परतवित तेच अंतर
घेईल समुद्र पोटी पण परतवील सारे
दावी अथांग प्रीती घडवीत क्रोध नंतर
बघण्यास तू सखे ये लाटाच मग किनारी
हसतात बहरुनी त्या जडवीत प्रेम मंतर
देतात स्वर जगाला ऐकवित सूर सुंदर
म्हणतो प्रशांत लाटा आहेत प्रिय निरंतर
प्रशांत कदम,