Saturday, May 13, 2023

प्रशांत गझल - लाटा !!



वृत्त - आनंदकंद 

गागालगा लगागा गागालगा लगागा


लाटा !!


येती अनेक लाटा दिसतात त्या कलंदर

खेळू नका परंतू असतात त्या भयंकर 


येतात वादळे ही जातात ती उडूनी 

लाटाच उत्तर देती परतवित तेच अंतर


घेईल समुद्र पोटी पण परतवील सारे

दावी अथांग प्रीती घडवीत क्रोध नंतर 


बघण्यास तू सखे ये लाटाच मग किनारी

हसतात बहरुनी त्या जडवीत प्रेम मंतर


देतात स्वर जगाला ऐकवित सूर सुंदर 

म्हणतो प्रशांत लाटा आहेत प्रिय निरंतर 


प्रशांत कदम, 

प्रशांत गझल ! का हसली !!



गालगालगा गागा गालगालगा गागा - रंगराग

का हसली !!

तू मनातले माझ्या ओळखून का हसली

उघडले जणू ईप्सित भासवून का हसली 


दुःख आपले पोटी घेत जगत होती तू

अश्रु ओघळत असता थोपवून का हसली 


ओळखून माझ्या त्या सर्व भूलथापांना 

असुनही चुकीचे मत डावलून का हसली


भांडलो जरी होतो मी तुझ्या बरोबर मग

जवळ बोलवित भांडण विसरून का हसली 


क्षण खरेच दुःखाचे आपल्यातले जास्ती

तर सुखातले दिवस आठवून का हसली 


प्रशांत कदम, 

मुंबई, 

१२~०५~२०२३,

९५९४५७२५५५.

©️✍🅿️

Sunday, April 9, 2023

प्रशांत गझल - जमते मला



गालगागा गालगागा गालगा

जमते मला !!


चंद्र तारे शोधणे जमते मला 

भाग्य माझे पाहणे जमते मला 


घेत जातो देत जातो शब्द मी

शब्द माझे पाळणे जमते मला


तत्व माझे चांगले मी वागणे

चांगले ते मानणे जमते मला


जातपाती भेद सारे टाळतो 

लीनतेने वागणे जमते मला 


कोणते ही काम नसते फालतू 

आब त्यांची राखणे जमते मला 


प्रशांत कदम, 

मुंबई 

०९~०४~२०२३.


Sunday, February 5, 2023

प्रशांत गझल - गाठ !!



गालगागा गालगागा  गालगागा - मंजुघोषा

गाठ !!

काल होतो मीच माझा, आज नाही

आज वेडे  प्रेम आहे, माज नाही


कालचे ते बदलले जग आणि मी ही 

थांग पत्ता लागला का ? खास नाही


श्रेय नक्की हे तुझे अन् मोहिनी ही

सत्य आहे सर्व काही भास नाही


स्वप्न व्हावे हे खरे ही एक आशा

तू मिळावी अन्य काही आस नाही


गाठ जुळली आपली जर ह्याच जन्मी

मेळ जमला तर मनाला त्रास नाही


प्रशांत कदम, 

मुंबई