Sunday, September 8, 2019

महान नागरिक !

महान नागरिक !

महान भारत देशांचे जागरूक
आम्ही महान आहोत नागरिक
असलो जरी आम्ही देशभक्त
मात्र सतत करतो आगळीक

असले जरी सरकारचे फर्मान
वा असो स्वच्छता अभियान
रस्त्यात टाकू घरातील घाण
मात्र स्वत:चे घर ठेवू छान

वेतनावर जरी असलो मोठ्या
कपाळावर आमच्या सदैव आठ्या
सहकाराच्या करू वार्ता खोट्या
मात्र कामात टाकू पाट्या

धर्म निरपेक्ष आमचा देश हवा
वर्ण भेद ही बिलकुल नसावा
फायद्यासाठी आरक्षित असावा
मात्र स्वत:चा समाज श्रेष्ठच रहावा

हरीत क्रांती व्हायलाच हवी
शेतकऱ्यांत समृद्धी यायला हवी
पण शेतीत आम्ही रमणार नाही
मात्र नवीन झाडे लावणार नाही

हेल्थ काॅंशीअस आम्ही भारी
सुदृढ शरीराची हौस ही न्यारी
व्यायाम आम्ही करणार नाही
मात्र जंक फूड सोडणार नाही

पाणी हवे आम्ही ओरडणार
पाण्या साठी वण वण फिरणार
पाटबंधारे ही नाही बांधणार
मात्र पाणी नाही वाचविणार

करांचे ओझे अजिबात नसावे
सरकारने कर्ज ही माफ करावे
जनतेच्या अपेक्षांचे ओझे वहावे
मात्र आम्ही आयकर ही चुकवावे

सरकारला आम्ही शिव्या घालणार
पोलीसांनाही नावे ठेवणार
कायदे कानून सतत मोडणार
मात्र शिस्तप्रिय स्वत:स ठरविणार

प्रशांत कदम,
१८-०४-२०१९
९५९४५७२५५५.

बाप्पा आये !

बाप्पा आये के निगाहोंमें छनक जाग ऊठी
दिलके सोये हुए तारोंमे छनक जाग ऊूठी
बाप्पा आये,

बाप्पा आये तो धरती पर नयी उमंगे छायी
जन्नतसी लहर भक्तों के दिलोंमे जागी
सपने सजने लगे, मनमे झंकार जाग ऊठी
बाप्पा आये

ऊनके आनेसे घर घर में खुशीयां आई
सज गये घर, महक ऊठी फुलोंकी सहर
दिप जलने लगे, फुलों की महक खिल ऊठी
बाप्पा आये

बाप्पाको देखते ही भक्तोंकी आंखे भर आयी
ऊनका आशिर्वाद पाने सबकी आंखे युं तरसी
दिल खिलने लगे, आखों में चमक जाग ऊठी
बाप्पा आये

गुड खोबरेके मोदक का प्रसाद चढाया ऊनको
लाल जास्वंद, दुर्वा का हार पहनाया ऊनको
बाप्पा मुसकुराने लगे, प्रसन्नता चेहरे पे जाग ऊठी
बाप्पा आये

बाप्पा के नाम की गुंज हर गली मचलने लगी
पुजा आरतीकी रस्म चारोओर बहरने लगी
जय घोष होने लगे, जयकार उनकी जाग ऊठी
बाप्पा आये
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
०६-०९-२०१९,