वृत्त - आनंदकंद
I am ex banker and now working as financial Consultant I love to write poems , skeet’s and articles on varied subjects. I have already published my two books. I am blog writer too. I love doing something unique and innovative and creative since childhood hood, I would like to be happy always, sportive and contended. This is my Digital Gazal’s , Poem’s Book. You can read all by just clicking on next arrow besides home button. Also please post feedback, remarks in a comment box.Thanks.
वृत्त - आनंदकंद
वृत्त - आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
लाटा !!
येती अनेक लाटा दिसतात त्या कलंदर
खेळू नका परंतू असतात त्या भयंकर
येतात वादळे ही जातात ती उडूनी
लाटाच उत्तर देती परतवित तेच अंतर
घेईल समुद्र पोटी पण परतवील सारे
दावी अथांग प्रीती घडवीत क्रोध नंतर
बघण्यास तू सखे ये लाटाच मग किनारी
हसतात बहरुनी त्या जडवीत प्रेम मंतर
देतात स्वर जगाला ऐकवित सूर सुंदर
म्हणतो प्रशांत लाटा आहेत प्रिय निरंतर
प्रशांत कदम,
गालगालगा गागा गालगालगा गागा - रंगराग
का हसली !!
तू मनातले माझ्या ओळखून का हसली
उघडले जणू ईप्सित भासवून का हसली
दुःख आपले पोटी घेत जगत होती तू
अश्रु ओघळत असता थोपवून का हसली
ओळखून माझ्या त्या सर्व भूलथापांना
असुनही चुकीचे मत डावलून का हसली
भांडलो जरी होतो मी तुझ्या बरोबर मग
जवळ बोलवित भांडण विसरून का हसली
क्षण खरेच दुःखाचे आपल्यातले जास्ती
तर सुखातले दिवस आठवून का हसली
प्रशांत कदम,
मुंबई,
१२~०५~२०२३,
९५९४५७२५५५.
©️✍🅿️
गालगागा गालगागा गालगा
जमते मला !!
चंद्र तारे शोधणे जमते मला
भाग्य माझे पाहणे जमते मला
घेत जातो देत जातो शब्द मी
शब्द माझे पाळणे जमते मला
तत्व माझे चांगले मी वागणे
चांगले ते मानणे जमते मला
जातपाती भेद सारे टाळतो
लीनतेने वागणे जमते मला
कोणते ही काम नसते फालतू
आब त्यांची राखणे जमते मला
प्रशांत कदम,
मुंबई
०९~०४~२०२३.
गालगागा गालगागा गालगागा - मंजुघोषा
गाठ !!
काल होतो मीच माझा, आज नाही
आज वेडे प्रेम आहे, माज नाही
कालचे ते बदलले जग आणि मी ही
थांग पत्ता लागला का ? खास नाही
श्रेय नक्की हे तुझे अन् मोहिनी ही
सत्य आहे सर्व काही भास नाही
स्वप्न व्हावे हे खरे ही एक आशा
तू मिळावी अन्य काही आस नाही
गाठ जुळली आपली जर ह्याच जन्मी
मेळ जमला तर मनाला त्रास नाही
प्रशांत कदम,
मुंबई
वृत्त - आनंद - गागालगा लगागा
मस्तीत येत जारे !!
नशिबात आपल्या रे
आनंद का नको रे
मस्तीत येत जारे
खेळू जमून सारे
दाटून मळभ आले
उघडेल पावसाने
सोडू नकोस आशा
दिसतील चंद्र तारे
दैवात माणसाच्या
येतात दुःख का रे
हसताच संगतीने
पळतील दूर ना रे
रिझतील सर्व श्रोते
अश्रूत डुंबणारे
गाणे असेच गावे
हो तृप्त ऐकणारे
वाईट आणि खोटी
संगत नको धरा रे
दुस-यांस देत जावे
जीवन असे जगा रे
प्रशांत कदम,
मुंबई
९५९४५७२५५५.
०९~१०~२०२२.
गालगा गालगा गालगा गालगा
चालता चालता मी असा थांबतो
हात हाती तुझा नी तुला पाहतो
रूप मोहक तुझे पाहता गुंततो
स्तब्ध होऊन मी फक्त न्याहाळतो
काय सांगू तुला खास माझी व्यथा
सुर्य चंद्रा पुढे आज झोकाळतो
रुप तुझे देखणे लाघवी वागणे
पाहता चंद्र ही रोज भारावतो
नयन ते मोहवी मोहिनी घालुनी
विसरुनी भान मग पुर्ण नादावतो
प्रशांत कदम,
१८~१२~२०२१,
९५९४५७२५५५.
वृत्त - सारंग : गागाल गागाल गागाल गागाल
हसणार नक्कीच !!
काही तरी आज घडणार नक्कीच
दडपण मनातील सरणार नक्कीच
केलीच आहे अशी मेहनत फार
यश आज हातात पडणार नक्कीच
भाग्यात दिसतात मिलनातले योग
ह्रदयातली गोष्ट खुलणार नक्कीच
पडतात कोडीच खंजीर पाठीत
गाठी जरी खूप सुटणार नक्कीच
येणार एकत्र झालो कधी दूर
सोडून मग दुःख हसणार नक्कीच
प्रशांत कदम,
गोरेगांव, मुंबई,
९५९४५७२५५५,
गागालगा लगागा गागालगा लगागा -
वृत्त - आनंदकंद
मनसोक्त आज भिजलो पाण्यात पावसाच्या
झिंगून नाचलो मी तालात पावसाच्या
विसरून मात्र गेलो माझ्या वयास पुरता
दंगून गात बसलो नादात पावसाच्या
पाऊस आज टप टप बरसून काय आला
गुंतून खास गेलो थेंबांत पावसाच्या
विज बघ नभात चमके गालात लाजताना
रंगून चिंब झालो छंदात पावसाच्या
थंडी तशीच भरली येता तूफान मोठे
थिंबून पूर्ण गेलो कहरात पावसाच्या
प्रशांत कदम,
मुंबई,
गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त
नवी पीढी !!
सुरुवात बैठकीची हास्यात होत आहे
त्याने बदल कदाचित भाग्यात होत आहे
बोलून मात्र कोणी उपयोग काय सांगा
पीढीच आज काही वाह्यात होत आहे
फाजील लाड सारे आयुष्य दुःख देते
परिणाम सर्व त्याचा त्राग्यात होत आहे
वाईट संगतीने वादात तोल जातो
अपसूक मग दुरावा नात्यात होत आहे
होतात खर्च मोठे नाही कुठे नियंत्रण
वित्तीय तूट भारी खात्यात होत आहे
प्रशांत कदम,
गालगागा गालगागा गालगागा गालगागा - व्योमगंगा
विश्वासघात !!
शांत आता सर्व झाले, शांत तू बसलास कारे
सांग माझ्या बोलण्यावर, काल तू रडलास कारे
काय माझे सांग चुकले, सांगता माझी कहाणी
स्तब्ध झाला तू खरोखर, पूर्णता गढलास कारे
तूच माझा गर्व होता, तूच माझे विश्व होता
पाहता मग मज अचानक, लाजुनी लपलास कारे
छान असता मित्र दोघे, वाढला नाहक दुरावा
कोणत्या रूपास आता, तू पुन्हा भुललास कारे
गुंतलेला जीव असता पुर्ण माझ्यावर तुझा तर
त्याच जीवा वर अचानक तू असा उठलास कारे
प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५,
१८~०८~२०२२.
●